महाराष्ट्रात पहिल्यांदाच श्रीरामपूर मधून वाल्मिकी समाजाचा उमेदवार विधानसभेसाठी रिंगणात.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच श्रीरामपूर मधून वाल्मिकी समाजाचा उमेदवार विधानसभेसाठी रिंगणात.
राष्ट्रीय श्रीराम संघ हा कट्टर हिंदुत्ववादी असल्याने शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी यांच्याशी बोलणे करून विधानसभा तिकिटासाठी मागणी केलेली होती. त्यात त्यांनी श्रीरामपूर मतदारसंघ कायम हिंदुत्ववादी उमेदवाराच्या हातातून गेलेला आहे. त्याची कारणे देखील तशीच आहे ज्यात उमेदवार एक तर बाहेरील किंवा मतदारसंघातील जरी असला तरी त्याची पकड कमी असल्याचे उमेदवार दिल्याने येथे हिंदुत्ववादी पक्षाचे उमेदवार निवडून आलेले नाही.
तसेच मागील दोन तीन वर्षापासून श्रीरामपूर मतदारसंघात लव जिहाद तसेच धर्मांतरांच्या घटना जास्त प्रमाणात घडल्या त्यावेळी कोणत्याही नेत्याने साध्या भेटी देखील घेतल्या नसल्याचे राष्ट्रीय श्रम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग यांनी सांगितले.
ते पुढे बोलताना म्हटले की राष्ट्रीय श्रीराम संघ हा कोणता पक्ष नसून हा धार्मिक कार्य करणारा संघ आहे. माझे मित्रत्वाचे संबंध आमदार खासदार मंत्री यांच्याबरोबर असून माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार तसेच पुढील धर्माचे काम करण्यासाठी मी नगरपालिका ग्रामपंचायत देखील उमेदवार देऊन लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यामध्ये तुम्ही उभे राहिल्यानंतर हिंदुत्ववादी पक्षाला मोठा फटका बसणार विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मी उभा राहिल्याने भाजप शिवसेना मोठा फटका बसणार असून पक्षाने याचा विचार करायला पाहिजे होता परंतु पक्षाने तसे काही केले नाही. माझी मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रभर मला मानणारा वर्ग असल्याने मला श्रीरामपूर सारखा मतदार संघातून निवडून येण्यास अशक्य नाही. हिंदुत्ववादाची कामे मार्गी लावण्यासाठी हिंदुत्ववादी विधानसभेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. या कारणाने पक्षाने जरी डावले तरी मी अपक्ष निवडणूक लढवणारच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.