राष्ट्रीय समाज पक्ष नेवासा विधानसभा स्वबळावर लढवणार – जिल्हाध्यक्ष जुंधारे
राष्ट्रीय समाज पक्ष नेवासा विधानसभा स्वबळावर लढवणार – जिल्हाध्यक्ष जुंधारे
राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच नेवासा येथे संपन्न झाली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री काशिनाथ माळी,मुख्य महासचिव माननीय ज्ञानेश्वर सलगर यांच्या आदेशाने राष्ट्रीय समाज पक्ष अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असुन गेल्या दोन महिन्यापासून पूर्ण तयारी सुरू असून अनेक निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात आहे त्याच अनुषंगाने नेवासा तालुक्यात आज उमेदवाराची चर्चा व आढावा बैठक संपन्न झाली नेवासा तालुक्यातील बूथ पर्यंतचा संपूर्ण डाटा पक्षांच्या कार्यालयात पाठवला असल्याने येथील संघटन मजबूत झाले आहे आणि पक्षाला सक्षम असा उमेदवार या ठिकाणाहून लढण्यास तयार असल्याचेही वरिष्ठांना कळविले आहे असे जिल्हाध्यक्ष जुंधारे यांनी सांगितले
या बैठकीला उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत मतकर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे ,उपजिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ होडगर, तालुका अध्यक्ष किशोर ईखे ,विधानसभा अध्यक्ष त्रिंबक भडगले आधी पदाधिकारी उपस्थित होते