क्षणिक लाभ पाहिला तर होणारा फायदा पण क्षणिकच असतो हा नैसर्गिक सिद्धांत*
*क्षणिक लाभ पाहिला तर होणारा फायदा पण क्षणिकच असतो हा नैसर्गिक सिद्धांत*
पृथ्वीवर सगळ्यात ,कुशाग्र बुध्दी चातुर्याने मानवाने आपल साम्राज्य निर्माण केले आहे हे वास्तव आहे तसेच आपण कितीही सामर्थ्यावान आणि प्रगत झालो .असलोत तरी अनेक असे नैसर्गिक सिद्धांत आहेत त्याच्या वर आपण आजपर्यंत तरी मात करू शकलो नाहीत . दैनंदिन जीवनात येणारे वेगवेगळे संकटं, घटनाक्रम घडत असताना आपण त्याकडे ज्या पद्धतीने पाहतो त्याच पद्धतीने त्याचा लाभ किंवा नुकसान आपल्यला सहन करावा लागत.महणुन त्या कडे नेमकं आपण कसं पाहतो हे अंत्यत महत्वाचे आहे.
आपलं मन आणि आजुबाजूला असणार जग ह्या दोन गोष्टी महा विचित्र आहेत . मनाला आणि जगाला प्रत्येक बाबतीत झटपट, फटाफट लाभ अपेक्षित असतो . सगळं काही क्षणातच मिळालं पाहिजे. रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल. पाहिजे .पद प्रतिष्ठा नाव लौकीक सदैव कायम राहिलं पाहिजे. हि प्रत्येक व्यक्ती ची अपेक्षा असते.ती असण्या मध्ये गैर असं काही नाही . तसेच आपल्या परिचयातील तसेच संपर्कातील ओळखितील ओळख असणारे व अनओळखी लोक असे सर्व लोकांना आपण सदैव प्रकाश झोतात असावं असं वाटतं असतं तसेच आपल्याला नेहमीच योग्य ठिकाणी पाहण्याची त्यांना आपेक्षा असते .असं लागलेली आसते. परंतु या सगळ्या गडबडीत मध्ये एक गोष्ट खुप महत्वपूर्ण हि आहे कि निसर्ग आणि निसर्ग चक्र याचा अनुभव पाहिला तर प्रत्येका गोष्ट नश्वर क्षण भंगुर आहे.आणी आणि चिरंजीव चिरकाल टिकणारी नाही . परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.महणुन मान ,सन्मान, अपमान ,यश, अपयश, किर्ती, अपकिर्ती, मोठेपणा,छेटेपणा ,या सर्व बाबींचा अनुभव घेत घेतच पुढे जावं लगात . आपण कितीही प्रयत्न केले योग्य असलो तरीही जीवनात अनेक योग्य,अयोग्य असे प्रसंग आपल्या वाट्याला येऊ शकतात .नव्हे ते येण नैसर्गिक आहे.पुढे जाणार मागे येणार ,मागे येणारा पुढे जाणार हे निसर्ग चक्र आहे .मग या सगळ्या मध्ये आपण जर लोक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी क्षणिक पाहिलं आणि निर्णय घेतला तर मग मात्र या मध्ये आपला लाभ सुद्धा क्षणिकच होणार आहे .हे निश्चित आहे .हा आजपर्यंत चा ईतिहास आहे याला कोणीही व्यक्ती अपवाद नाही . म्हणून जीवनातील विविध क्षेत्रातील बाबींचा विचार केला तर यशोशिखरावर जात असताना अडचणी येऊ शकतात येण स्वभाविक आहे. मात्र मार्गक्रमण करत असताना क्षणिक लाभाचा विचार करू नका . आपण जेवढा दुरचा विचार करू तेवढंच आपलं यश आणि लाभ दिर्घ काल टिकण्याची शाश्वती व शक्यता असते. आणि आपण जर आजच आत्ताच पाहिलं क्षणिक पाहील तर लाभ सुद्धा क्षणिकच होणार या मध्ये काही वेगळं नाही . नैसर्गिक सिद्धांत हेच सांगतो कि आपण जितके जवळ पाहणार तितकं जवळ दिसणार जितकं दुरच पाहणार तितकं दुरच दिसणार .आपण जर मला आज काय मिळवता येईल याचा विचार केला तर मिळणार लाभ हा सुद्धा आज पुरताच मर्यादित असेल .आणि एकंदरीत आज काही गमावव लागलं तरी चालेल परंतु भविष्याचा विचार केला तर भविष्या मध्ये नक्कीच प्रदीर्घ आणि चिरकाल नावलौकिक होणारा लाभ पण सुयोग्यच मिळणार .म्हणून आपण काय विचार करतो आहेत आणि लोकांचं मत काय आहे. या पेक्षा आपण सवीकारलेला लाभ हा क्षणिक असेल तर त्या मधुन निर्माण होणारा आंनद, फायदा , किंवा समाज उपयोग हा सुद्धा क्षणिक असतो . म्हणून क्षणिक गोष्टी कडे लक्ष न देता दिर्घकाळ लाभदायी ठरेल असाच निर्णय घेतला पाहिजे किंवा असाच लाभ स्वीकारला पाहिजे. आणि आजचा विचार करण्यापेक्षा उद्याचा विचार केला पाहिजे तो नक्कीच हितकारक असतो.