आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीदेश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
भारतातील शिक्षण व्यवस्था ही जगात सर्वश्रेष्ठ… सौं.अनुराधाताई नागवडे,
भारतातील शिक्षण व्यवस्था ही जगात सर्वश्रेष्ठ… सौं.अनुराधाताई नागवडे,
टाकळीभान: भारत देशातील शिक्षण व्यवस्था जगात सर्वश्रेष्ठ असून ही अतिशय उच्च प्रतीची असून इतर बाहेरील देशांमध्ये नासा, अमेरिका आदी ठिकाणी उच्च पदावर भारत देशातील लोक उच्च पदावर आहेत ते येथील देशातील शिक्षण व्यवस्थेवरच यशस्वी होऊन उच्च पदावर गेलेले आहेत असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते प्राईड अँकेडमी, टाकळीभान या नूतन शाखेचे उद्घाटन पार पडले याप्रसंगी श्रीरामपूरच्या मा. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, ह-भ-प आरती ताई शिंदे, अशोक नाना कानडे, माजी सभापती नानासाहेब पवार, प्राइड एकेडमी संस्थेच्या संस्थापिका मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे , जिल्हा काँग्रेसचे माऊली मुरकुटे, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना नागवडेताई पुढे म्हणाल्या की सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी अतिशय संघर्षातून, स्वकर्तृत्वावर, या शैक्षणिक संस्था उभारीला आणत आहेत त्या आमच्या साठी प्रेरणास्त्रोत आहेत. ग्रामीण भागामध्ये एवढ्या दर्जेदार शिक्षण सुविधा त्या पुरवत आहेत हे निश्चितच त्यांचे काम कौतुकास्पद आहे.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.जयश्रीताई थोरात यांनी कॅन्सर विषय माहिती देऊन कॅन्सर वर उपचार केले असता ,तो बरा होतो याविषयी जनजागृती केली ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्त्व सांगून या ठिकाणी शैक्षणिक संस्था उभारून डॉ. वंदनाताई व माऊली सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा अत्यंत चांगला विचार आहे. यामुळे निश्चितच येथे चांगले विद्यार्थी घडतील असे त्या म्हणाल्या. यावेळी नगराध्यक्ष मा.अनुराधाताई आदिक आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की टाकळीभान सारख्या ठिकाणी दर्जेदार उत्तम शिक्षण देणारी संस्था शाखा काढून या दाम्पत्याने टाकळीभान च्या विकासात भर टाकली आहे. निश्चितच येथे उत्तम दर्जेदार विद्यार्थी घडतील, ज्ञानाबरोबर अध्यात्मज्ञान ही याठिकाणी दिल्याने याठिकाणी संस्कारक्षम पिढी घडण्याचे काम होईल असे अनुराधा ताई आदिक म्हणाल्या,
या प्रसंगी अशोक कानडे म्हणाले की डॉ.वंदनाताई व माऊली विठ्ठल रुक्माईची जोडी असून ही आजच्या काळातील देवमाणस आहेत, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून समाज घडवण्याचे पवित्र काम त्यांनी हाती घेतले असून आपण त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहावे
माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे यांनी मुरकुटे दाम्पत्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमप्रसंगी माजी सभापती नानासाहेब पवार शरद नवले, किशोर बकाल, अभिषेक खंडागळे, सचिन मुरकुटे, मा. उपसभापती नितीन भागडे, माजी सरपंच मंजाबापू थोरात , शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, दिलीप पवार, राधाकृष्ण वाघुले,भाऊसाहेब मगर,शांताराम तुवर, देवा कोकणे नारायण काळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.