तागड कुटुंबीयावरील खोटा गुन्हा माघे न घेतल्यास पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा.
तागड कुटुंबीयावरील खोटा गुन्हा माघे न घेतल्यास पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा.
सोनई, नेवासा तालुक्यातील सोनई येथे दिनांक 2 रोजी तागड आणि खोसे यांच्यामध्ये हाणामारी झाली होती त्याबाबत सोनई पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते त्याबाबत सोनई ग्रामपंचायतच्या सदस्या सौ जयश्री सुनील तागड यांनी सोनई पोलीसाना निवेदन देऊन तागड कुटुंबीयावरील खोटा मागे न घेतल्यास सोनई पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे पोलिसांना दिलेला निवेदनात म्हटले आहे म्हटले आहे की माझे पती सासू सासरे यांच्यावर सागर अरुण खोसे, अरुण खोसे व कुटुंबीयांनी तागड कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केला आहे खोसे कुटुंबियांनी प्राणघातक हल्ला तागड कुटुंबावर केला यामध्ये तागड कुटुंब जखमी झाले तसेच याबाबत सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता काही वेळाने पोलिसांनी कुठली शहानिशा न करता तागड कुटुंबीयांवर जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल करून घेतला आहे हे अतिशय दुर्दैवी आहे समाजामध्ये यावरून तागड कुटुंबाची बदनामी झाली असून तागड कुटुंबीय हे प्रतिष्ठित कुटुंब असून समाजामध्ये त्यांची चांगली प्रतिष्ठा आहे वास्तविक पहता खोसे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये जी वेळ टाकली आहे त्या वेळेला सौ तागड यांचे पती सुनील तागड सीसीटीव्ही फुटेज मध्ये पोलीस स्टेशनच्या आवारात दिसतात तरी सोनई पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता तागड कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केला आहे तरी सोनई पोलिसांनी गुन्हा मागे न घेतल्यास सोनई पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशारा पोलिसांना दिलेल्या निवेद्वानाद्वारे दिला आहे. चौकट. सोनई पोलीस ठाणे बनले आर्थिक तडजोडीचा अड्डा आर्थिक देवाण-घेवाण करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वेळेत लक्ष घालावे याला वेळीच आवर घालावा. धनंजय वाघ. सरपंच सोनई ग्रामपंचायत सोनई. चौकट. बदनामी करण्याचे प्रकार थांबवा सोनई ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सोनई पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत व तडजोड करून खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याचे प्रकार वाढल्याचे दिसते यावर तातडीने अंकुश घालून हे प्रकार बंद करावे अशी मागणी सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पोलिसांना निवेदनाद्वारे केली आहे