जुन्या परंपरेला फाटा देत मुलीनेच केले पित्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी
जुन्या परंपरेला फाटा देत मुलीनेच केले पित्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी
बेलापुर (प्रतिनिधी ) – वडीलांचे अंत्यसंस्कार मुलानेच करण्याची परंपरा समाजात प्रचलीत आहे मुलगा नसेल तर पुतण्या सर्व विधी करतो परंतु श्रीरामपुरात एका मुलीने सर्व रुढी परंपराचे जोखड बाजुला सारुन आपल्या वडीलाच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडले याबाबतचे वृत्त असे की, श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावालगत असलेल्या नेहरूवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सुभाष साळूंके हे गेल्या काही वर्षापासून श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.7 मधील रामचंद्रनगर येथे राहतात. त्यांना एक मुलगी आहे. , तीने उच्च शिक्षण घेतले तसे उच्च विचारही अंगीकारले तिचे वडील सुभाष साळूंके यांचे अचानक निधन झाले त्यांना एकच अपत्य ते ही मुलगी असल्यामुळे सर्व विधी कोण करणार? हा प्रश्न उभा राहीला अन वडीलांच्या अचानक जाण्याचे अपरिमीत दुःख असतानाही तिने सर्व विधी करण्याचा धाडसी निर्णय घेतला माझ्या पित्याचे अग्निदहन , शिकाळी मीच धरणार, पाणी मीच पाजणार सर्व विधी मलाच करु द्या मीच त्यांची मुलगी अन मीच त्यांचा मुलगा असे सर्वांना सांगितले अन सर्व विधी स्वतःच केले आजही समाजात मुलगा व मुलगी असा भेदभाव केला जातो अशा लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न रुपाली हीने केला