दक्ष नागरिक फाऊंडेशन ही सामाजिक जाणिवेतुन नेहमीच अनेक विषयांसाठी काम करत अग्रेसर असते.

दक्ष नागरिक फाऊंडेशन ही सामाजिक जाणिवेतुन नेहमीच अनेक विषयांसाठी काम करत अग्रेसर असते.
सर्व सामान्यांचे हिताचे व दैनंदिन जीवनामध्ये येणा-या अडचणी सोडवत असते. प्रशासकीय अधिकारी व नागरिक यांचेमधील दुवा म्हणुन सर्वश्रुत आहे. हे सर्व करत असताना भारत मातेचे सुपुत्र म्हणजे भारताच्या सरहद्दीवर तळहातावर शीर घेऊन सेवा करत असतात. त्यांचे ऋण फेडणे आपल्याला कद्यपि शक्य नाही. कारगील युध्दामध्ये कामी आलेले वीर जवानांना मानवंदना देण्यासाठी तसेच सध्या कर्तव्य बजावणारे जवानांचा उत्साह वाढविण्यासाठी दक्ष कडुन जय जवान दक्ष वारी काढण्यात येत आहे.
शनिचौक, श्रीगोंदा येथे लेह-लद्दाख येथे बाईकवर जाणारे तरुणांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार मिलिंद कुलथे हे बोलताना म्हणाले कि, दक्ष नेहमी सामाजिक काम करत असते. सर्वच उपक्रम कौतुकास पात्र असतात. आज सरहद्दीवर जाऊन जवानांना मानवंदना देण्यासाठी निघालेले तरुण पाहुन मनाला समाधान वाटले. तुमच्या मानवंदनेने इतर तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल. संपुर्ण श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या वतीने तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
डॉ.नितीन खामकर म्हणाले कि, कोरोना नंतर नागरिकांच्या हालचालीस वेग आला आहे. दक्षची बाईकवरुन जाणारी वारी सर्वांसाठी प्रेरणा ठरेल. मंगेश देवरे यांनी मनोगत व्यक्त करताना बोलले कि, तरुण युपीएससी व एमपीएससीचा अभ्यास करताना शारिरीक वृध्दी होणे गरजेचे आहे. देशाचे हित लक्षात घेऊन तरुणांनी कार्य केले पाहिजे. दक्षकडुन सामाजिक संस्थांनी काही तरी घेणे गरजेचे आहे. श्रीगोंदा नगरपालिकेचेवतीने मनोमन शुभेच्छा.
मेजर उध्दव खामकर यांनी लेह-लद्दाख येथे प्रवास करताना घ्यावयाची काळजी, उपाय योजना समजावुन सांगितल्या.
बाईकवर जाणारे तरुण कार्यकर्ते जयेश जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. आपणां सर्वांच्या आपेक्षा आम्ही पुर्ण करुन जवानांना मानवंदना देऊन आमच्याही जीवनात त्यांचे गुण उतरवु.
सुत्र संचालक दक्षचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी केले. आभार दक्षचे संचालन धनेश गुगळे यांनी मानले.
याप्रसंगी मा.श्री.मिलिंद कुलथे(तहसीलदार,श्रीगोंदा तालुका), मा.श्री.तुकाराम पालवे(दुय्यम निबंधक,श्रीगोंदा तालुका), मा.श्री.डॉ.नितीन खामकर(तालुका आरोग्य अधिकारी, श्रीगोंदा तालुका), मा.श्री.मंगेश देवरे(मुख्याधिकारी श्रीगोंदा नगरपरिषद), मा.श्री.उध्दव खामकर(सेवानिवृत्त सैनिक), मा.श्री.इब्राहिम इनामदार चाचा(विखे समर्थक), मा.श्री.श्रीरंग साळवे(जेष्ठ संचालक दक्ष नागरिक फाऊंडेशन), मा.श्री.दिगंबर भदे(संचालक दक्ष नागरिक फाऊंडेशन), मा.श्री.धनेश गुगळे(संचालक दक्ष नागरिक फाऊंडेशन), मा.श्री.मिलिंद कुलकर्णी(संचालक दक्ष नागरिक फाऊंडेशन), मा.श्री.शिवाजी साळुंके(संचालक दक्ष नागरिक फाऊंडेशन), मा.श्री.गणेश जाधव(तालुका प्रचारक रा.स्व.संघ), मा.श्री.सतिष बोरुडे(संभाजी ब्रिग्रेड शहराध्यक्ष), मा.श्री.पवार सर(सेवा निवृत्त केंद्र प्रमुख), मा.श्री.संदिप ढवळे(फोटोग्राफर), मा.श्री.महेश क्षिरसागर(भाजपा सोशल मिडीया प्रमुख), बाईकवर जाणारे तरुण जवान जयेश जगताप, गणेश ढवळे, दिनेश वाळके, अविनाश लाकुडझोडे आदी उपस्थित होते.