ग्रामविकास अधिकारीची बदली, होत नसल्याने, मुरकुटे- विखे गटाकडून 22 तारखेला गट विकास अधिकारीच्या दालना ठिय्या आंदोलन ,
ग्रामविकास अधिकारीची बदली, होत नसल्याने, मुरकुटे- विखे गटाकडून 22 तारखेला गट विकास अधिकारीच्या दालना ठिय्या आंदोलन ,
टाकळीभान येथील कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी आर .एफ.जाधव यांची बदली बाबत अनेक वेळा तोंडी किंवा लेखी तक्रार करून देखील त्यांची बदली करण्यात आलेली नाही.
सदर ग्रामविकास अधिकारी यांची बदली त्वरित करण्यात यावी अन्यथा २२/१२/२०२२ रोजी आपल्या दालनात ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात येईल असे निवेदन मुरकुटे – विखे गटाच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
ग्रामविकास अधिकारी जाधव हे सलग दहा वर्षांपासून एकच गावात कार्यरत कसे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मनमानी कारभार करण्याची पद्धत तसेच ग्रामविकास अधिकारी अनेकवेळा कार्यालयात हजार नसतात, तसेच सुचवलेले कामांकडे दुर्लक्ष करतात अशी ग्रामस्थांनी सरपंच व गावातील जेष्ठ पुढारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्याच अनुषंगाने हे निवेदन दोन्ही गटांच्या वतीने देण्यात आले. ग्रामविकास अधिकारी हे गावात गटा-तटाचे राजकारण करून गावात तेढ निर्माण करू पाहत असल्याचा आरोप दोन्ही गटांच्या वतीने करण्यात आला आहे. आठ दिवसांच्या आत बदली न केल्यास कुठल्याही परिस्थितीत आंदोलनावर ठाम असल्याचे दोन्ही गटांचे म्हणणे आहे. जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत सर्व कामकाज बंद ठेवणार असल्याचे सरपंच अर्चना रणनवरे यांनी सांगितले.
सरपंच अर्चना रणनवरे, माजी सभापती नानासाहेब पवार, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, माजी व्हाइस चेअरमन दत्तात्रय नाईक, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, मयुर पटारे, यशवंत रणनवरे, सोसायटीचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, सुनील बोडखे, शंकर पवार, भाऊसाहेब पवार, अविनाश लोखंडे, नारायण काळे, रमेश पटारे, दीपक पवार, माजी उपसरपंच पाराजी पटारे, संजय रणनवरे, दत्तात्रय मगर, बाबासाहेब नवघणे, रावसाहेब वाघुले, संजय पटारे, संतोष जाधव, चंद्रकांत थोरात, मल्हार रणनवरे, शिवाजी पवार, शिवाजी पटारे, बापू गायकवाड, भाऊसाहेब पटारे, योगेश बिरदवडे, भैय्या पठाण, अनिल बोडखे, सोमनाथ पटारे, सागर पटारे, भागवत रणनवरे, सुभाष येवले, बद्रीनाथ पटारे, देवनाथ पाबळे, विकास पटारे आदींच्या सह्या आहेत.