जालना औद्योगिक वसाहतीतील रुपम स्टील या कंपनी मुळे प्रदुषण
जालना औद्योगिक वसाहतीतील रुपम स्टील या कंपनी मुळे प्रदुषण वाढत आहे
जालना औद्योगिक वसाहतीतील रूपम स्टील या कंपनीमुळे परिसरात प्रदूषण वाढत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जालना हा प्रादुषित जिल्हा म्हणून आधीच कुख्यात आहे.आता तर या प्रदूषणही आपली पातळी ओलांडली आहे. येथील एक पर्यावरण अभ्यासिक व दोन डाॅक्टारांनी केलेल्या एका आँनलाईन सर्वेक्षणातून जालन्यातील 90% नागरिकांचा जीव गुदमरत असल्याचे विदारक वास्तव यातुन समोर आले आहे.अशा वातावरण जगण्यापेक्षा दुसरीकडे जाण्याच्या तयारीत आहेत.या सर्वेक्षणातील 70% लोक जालना शहरातील आहे.जालना औद्योगिक वसाहतीतील रूपम स्टील असे अनेक नामांकित कंपन्यांच्या कारखाने मुळे सर्वात जास्त प्रदूषण जालना शहरात होत असून रूपम स्टील व इतर कारखान्यामुळे जालना शहरातील नागरिकांचे अनेक आजार वाढले आहे. श्वासनचे आजार बळवले. इतकेच नव्हे तर चंदनझीरा व जवळपास असलेल्या परिसरातील घरातील एक तरी व्यक्ती आजारी असल्याचे कळते. देशात प्रदूषित जिल्हा म्हणून जालना शहराकडे बघितले जाते मर्यादा बाहेर प्रदूषण ओकणारे येथील उद्योग याला सर्वस्व कारणीभूत ठरत आहे हे उद्योग किती फायदेशीर आहे याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपजिल्हा जालना विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यामुळे हे औद्योगिक वसाहतीतील रुपम स्टील व इतर कारखानेदार मजेत आहे. या कारखान्यामुळे परिसरात नागरिकांचे धुरीमुळे अपघात होत आहे. तसेच रुपम स्टील कंपनीच्या जवळपास महाविद्यालय व शासकीय कार्यालय सुद्धा आहे महाविद्यालयातील त्यांचे व विद्यार्थिनीचे शिक्षण घेताना धुळीमुळे त्रस्त होत आहे व शासकीय अधिकाऱ्यांना व रहदारी करणाऱ्या नागरिकांनाही या धुळीचा त्रास होत असून रूपम स्टील कंपनीत काम करणारे कामगारांचे आरोग्य धोक्यात आहे. या कंपनी मालकावर व प्रदूषण नियंत्रण अधिकारी जालना यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित करण्यात यावे व रुपम स्टील कंपनी व इतर कारखाने तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी उमेश कुटे वंजारी महासंघ जालना जिल्हाअध्यक्ष, व ज्ञानेश्वर कोलते, राहुल भोसले, परमेश्वर केंद्रे, प्रेम राज गायकवाड , मंगेश पाची पांडव, संतोष भालेराव व इतर यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे.व लवकरात लवकर कंपनी व अधिकाऱ्यावर कारवाई करावी असे मागणी केली आहे ,कारवाई न केल्यास दिनांक 25 मे २०२३, गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करणार आहे. असे निवेदन म्हटले आहे