लग्नाचा गोंधळ ..चक्काजाम लांबच लांब रांगा…कधी सुटणार हा तिढा*

*लग्नाचा गोंधळ ..चक्काजाम लांबच लांब रांगा…कधी सुटणार हा तिढा*
श्री तीर्थक्षेत्र आळंदी हि आता लग्नाची आळंदी म्हणून प्रसिद्ध आहे. माऊलींना येणारी लोकं कमी.मात्र लग्नाला येणाऱ्या लोकांची संख्या आळंदीत जास्त आहे. त्यातच बेशिस्त पनाचा कळस आणि चार चाकी गाडी अडथळा होईल अशी लावून लोकांवर दादागिरी करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. आज रविवार आळंदी मध्ये मोठ्या प्रमाणात लग्नाची तीथ होती आणि त्याचा परिणाम रस्त्यावर जाणवला. लग्नाच्या गर्दीमुळे आळंदीमध्ये वडगाव रोड .पोलीस स्टेशन .जुना पूल. ते देहू फाटा या ठिकाणी लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसल्या
.त्यातच चाकण रस्ता थोडा प्रमाणात मोकळा असला तरी वडगाव रोड मुळे मात्र संपूर्णआळंदी जाम झाल्याचे निदर्शनास आले.बेशिस्तपणे रस्त्यावरच वाहने पार्क करण्याची जशी परंपरा आळंदीत आहे. पोलीस कारवाई करतात आणि बेशिस्त वाहन चालक काही केल्या दाद देत नाही.असे दिसून येते. लग्नाच्या राड्यामुळे आळंदीतील स्वास्थ्य मात्र बिघडलेले आहे.जागा मिळेल तिथे चार चाकी गाडी पार्क केल्या जातात. वेळेप्रसंगी ग्रामस्थांवरच मगरुरी. दादागिरी केली जाते. आणि वाहन पार्क केल्यानंतर स्थानिक नागरिकांना होणारा त्रास याची तमा ही हे लोक बाळगत नाहीत.त्याचाच परिणाम आज आळंदीमध्ये दिसून आला. मोठ्याच्या मोठ्या लांबच्या लांब रांगा आणि ट्राफिक मात्र काही केल्या सुरळीत होत नाही. अशी स्थिती होती हा त्रास वयोवृद्ध, बाल, आणि प्रसंगी रुग्णवाहिकेलाही याचा त्रास जाणवताना दिसला.येणाऱ्या काळात असणाऱ्या लग्नाच्या वरदळीत वाहन रस्त्यावर पार्क करणाऱ्या वर.त्याच अनुषंगाने लग्न कार्यालयावर ही कडक कारवाईची मागणी.नागरिकांतून होताना दिसत आहे.