बोगस कर्ज वाटप प्रकरणी नागेबाबा मल्टीस्टेटचे कडूभाऊ काळे व राजेंद्र गुगळेंसह आठ ते दहा जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

बोगस कर्ज वाटप प्रकरणी नागेबाबा मल्टीस्टेटचे कडूभाऊ काळे व राजेंद्र गुगळेंसह आठ ते दहा जणांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
तब्बल 17 कोटी रुपयांच्या बोगस कर्ज वाटप प्रकरणात सहभागी असलेल्या नागेबाबा मल्टीस्टेट या संस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ छगन काळे, बाळासाहेब रेवणनाथ टिक्कल, नेवासे पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र तखतमल गुगळे, त्यांची पत्नी राणी राजेंद्र गुगळे, जयराम गोरक्षनाथ काळे, अमोल मनोहर शिंदे आदींसह आठ ते दहा जणांविरुद्ध भादंवि ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, १२० (ब) या कलमान्वये नेवासे न्यायालयाच्या आदेशानुसार सोनई पोलीस ठाण्यात आज (दि. २२) गुन्हा दाखल करण्यात आला.
बोगस कागदपत्रांच्या आधारे कडूभाऊ काळे यांच्या नागेबाबा पतसंस्थेतून एकदा सात कोटी आणि नंतर १० कोटी असे एकूण १७ कोटी रुपयांचं बोगस कर्ज मंजूर करून घेतलं गेलं होतं. विशेष म्हणजे नागेबाबा मल्टीस्टेट या संस्थेनेदेखील या संदर्भातल्या कुठलीही शहानिशा न करता हे कर्ज मंजूर केलं होतं.
नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूर येथील भानुदास यादव बानकर यांची ही मूळ जमीन आहे. ती त्यांनी त्यांची मुलं अनुक्रमे पाराजी भानुदास बनकर आणि लक्ष्मण भानुदास बनकर यांना सहा लाख रुपये विकली. या जमिनीतली ८० आर जमीन सदर दोन्ही मुलांनी वडिलांना चार कोटी रुपयांना विकल्याचं भासवलं आणि त्यासाठी वीस लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. या जमिनीच्या बोगस व्यवहारात 2020 सालच्या खरेदीसाठी 2019 सालची कागदपत्रं जोडण्यात आली होती.
असे प्रकाश शेटे यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारी म्हटलं आहे.
त्या तक्रारीचे अनुषंगाने न्यायाधीश ए. एस. गुंजवटे यांनी प्रमुख सहा जणांसह इतर आठ ते दहा अज्ञात इसमांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सोनई पोलिसांनी दि. २२रोजी वरील सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला.