अपघातब्रेकिंग

श्रीरामपुरातील वरिष्ठांच्या कारवाईला वैतागून कर्मचाऱ्याने घेतला गळफास…

श्रीरामपुरातील वरिष्ठांच्या कारवाईला वैतागून कर्मचाऱ्याने घेतला गळफास…

 

श्रीरामपूर महावितरण विभागातील तांत्रिक कामगार संदीप मधुकर पाटोळे हे श्रीरामपूर महावितरण मध्ये प्रधान तंत्रज्ञ या पदावर कार्यरत होते.गेल्या काही दिवसापासुन वरिष्ठांनी कक्षे बाहेरील काम दिल्याने त्यांच्यावर ताण पडू लागला व ते आजारी पडले.दरम्यान या आजाराच्या उपचारासाठी ते पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर राहिले होते.

 

       या कारणामुळे कार्यकारी अभियंता श्रीरामपूर यांनी दिनांक 12 जुलै 2022 रोजी विनापरवानगी गैरहजर राहिले म्हणून संदीप पाटोळे यांच्या विरोधात बडतर्फीचा(सेवेतून बाहेर)आदेश काढला होता. या आदेशाविरोधात संदीप पाटोळे हे वरिष्ठांकडे अपील करत दाद मागत होते.परंतु त्यांना दाद मिळाली नाही.त्यांची बडतर्फी कायम ठेवण्यात आल्यामुळे श्री.संदीप पाटोळे यांनी आज ०८ ऑगस्ट रोजी त्यांच्या सौंदाळा ता.नेवासा येथील राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली असा वरील आशयाचा आरोप महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगारांची संघटना यांनी केला आहे.

या घटनेमुळे तांत्रिक कामगार व तांत्रिक कामगारांची संघटना या प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांसह महावितरण कंपनीचे अध्यक्ष व इतर प्रमुख मंडळींशी तात्काळ पत्रव्यवहार करून संदीप पाटोळे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आज 8 ऑगस्ट 2022 रोजी पत्राद्वारे केली आहे.

 

        वरिष्ठांच्या हुकूमशाही कार्यपद्धती मुळे एका गरीब कामगाराला स्वतःची जीवन यात्रा संपवावी लागली असल्याचे मत सहकारी कामगारांकडून व्यक्त होत आहे.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे