अपघातगुन्हेगारी

काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर झालेल्या बेछूट गोळीबाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी – अमित मुथा

काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर झालेल्या बेछूट गोळीबाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी – अमित मुथा

 

*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर झालेल्या बेछूट गोळीबाराची सखोल चौकशी करून दोषींना ताब्यात घेऊन कडक शासन करण्याची मागणी स्वांतत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी पोलीस प्रशासननाकडे निवेदनाद्वारे केली आहे.*

 

              मतदान प्रक्रिया सुरू होण्याअगोदर म्हणजे सात तास अगोदरच रात्री बारा साडे बारा ते एकच्या दरम्यान श्रीरामपूर मतदारसंघाचे उमेदवार व काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अज्ञात इसमांनी अशोक कारखाना मुख्य गेटसमोर बेछूट गोळीबार केला.त्या गोळीबारात कांबळे सुदैव्याने बालंबाल बचावले.जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरून सोडणारी गोळीबाराची गंभीर घटना घडूनही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली तर मतदारांमध्ये भीतीच्या वातावरणापेक्षा चौका चौकात मात्र चर्चेला उधाण आलेले दिसत होते.प्रत्येक निवडणुकीत नेहमी सक्रिय राहणारे विरोधक कार्यकर्ते मात्र व्हीलचेअरच्या फ्लॉप शो नंतर सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला गोळीबारचा हा स्टंट असल्याची चर्चा हसून करतांना चौका चौकात दिसत होते तर माजी आमदारावर गोळीबार झाल्या नंतर कांबळे यांना पोलीस संरक्षण देण्या ऐवजी पोलिसांनी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्तेनाच पोलीस संरक्षण देण्यामागील गौडबंगाल काय..?असाही प्रश्न नागरिकांना पडलेला आहे असे त्यांच्या चर्चेतून जाणवत होते. निवडणूक शांततेत पार पडल्यानंतर माजी आमदार कांबळे व त्यांचे कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेऊन आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करतील असे वाटत असतांनाच सगळे काही आलबेल आणि शांत झाल्याने व कांबळे हे मतदानानंतर बांगला देशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधातील आंदोलन मोर्चात प्रथमच दिसल्याने मतदारांच्या व विरोधकांच्या चर्चेला मात्र त्यामुळे पुष्टी मिळत आहे.

 

                    अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना अमित मुथा यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,निवडणूक काळात राज्यातील दोन मतदार संघात उमेदवारांवर हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. जळगाव व हिंगोली मतदारसंघात उमेदवारांवर झालेल्या गोळीबार व हत्यारांनी केलेल्या हल्ल्या चा स्थानिक पोलीस प्रशासनाने छडा लावून आरोपींना ताब्यात घेतले आहे.श्रीरामपूरात माजी आमदारावर गोळीबार होऊनही अद्याप तपास चालू असल्याचे मोघम उत्तर पोलीस देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत भितीचे वातावरण निर्माण होऊन भविष्यात नागरिक मतदानासाठी निर्भिडपणे घराबाहेर पडण्यास घाबरतील त्यामुळे निवडणूक प्रक्रिया धोक्यात येईल याचा सारासार विचार पोलीस प्रशासनाने करून लवकरात लवकर तपास लावावा असे मुथा यांनी निवेदनात म्हंटले आहे.

 

        निवडणुकीत सहानुभूती मिळावी म्हणून जळगाव व हिंगोली या दोन्ही ठिकाणी हल्ले झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्या नंतर उमेदवारांसह इतरांवरही गुन्हे नोंदवून त्यांना अटक झालेली आहे.तशीच कार्य तत्परता श्रीरामपूरच्या पोलीस प्रशासनाने देखील दाखवावी अशी मागणी आता नागरिकां मधूनही जोर धरू लागली आहे.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे