इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत! वाचा मोठी बातमी*
*इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत! वाचा मोठी बातमी*
राज्यात, देशात आणि परदेशातही आपल्या विनोदी शैलीतून किर्तन करून समाजाला प्रबोधनाचे धडे देणाऱ्या इंदुरीकर महाराजांचा
आता एक किस्सा चर्चेत येत आहे. त्यांनी एका कीर्तनात चक्क कॅमेरामन मोबाईल आणि युट्युब चॅनेलवाल्यांना चांगलेच धारेवर धरल्याचं दिसत आहे. माझ्या विधानांचा विपर्यास केला जात असून प्रसिद्धीसाठी, टीआरपीसाठी मला बदनाम केलं जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
बीडमधील परळी तालुक्यात कीर्तन करण्यासाठी इंदुरीकर महाराज उभे राहिले असता कॅमेरा पाहताच ते जरासे संतापले. “कॅमेरे बंद करा आणि खाली उतरा, जिरवले तुम्ही आमचे…ते अगोदर खाली काढून घ्या”, असं म्हणत असतांना एक जणाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संताप वाढला. कॅमेरे बंद केले नाहीत आणि प्रवचनानंतर काही बातम्या प्रकाशित झाल्या तर आयोजकांनी याची जबाबदारी घ्यावी असं चालू माईकवरून इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
पुढे इंदुरीकर महाराज म्हणाले की, “अहो ते 2 तास कीर्तन युट्यूब ला दाखवणे काही प्रॉब्लेम नाही. मात्र ते पूर्ण कधीच यु ट्यूबला टाकणार नाहीत. इकाडलं एक वाक्य घेणार आणि दुसरीकडलं एक वाक्य घेणार आणि व्हिडीओ तयार करून टीआरपी वाढवणार. पण असे अर्धवट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे फळ आम्हाला भोगायला लागते आणि सध्याही आम्ही भोगत आहोत. जर फेसबुक, यू-ट्यूब, इन्स्टाग्राम वगैरे सोशल मीडियावर याची एखादी क्लिप आली तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल का”, असंही त्यांनी विचारलं.
दरम्यान या वेळी अचानक धनंजय मुंडे म्हणाले, आठ दिवस कार्यक्रम थेट युट्युब वर प्रदर्शित केलाय, मग इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम थेट दाखवला नाही, तर त्याची काय परिस्थिती होईल याचा आमच्या सारख्याला विचार करावा लागतो. त्यांना जो व्यवसाय करायचाय तो करू द्या, तुम्ही आध्यात्मिक कार्य सुरू ठेवावे”, असं धनंजय मुंडे यांनी अखेर प्रसार माध्यमांचे कॅमेऱे त्यांना जे काम करायचं ते करतील, आपण अध्यात्माचं काम करावं, असे म्हटले आणि कीर्तन पुढे सुरु ठेवण्यास विनंती केली.