हे आहेत’आमच्या पप्पांनी गणपती आणलाय’ गाण्याचे खरे स्टार

हे आहेत’आमच्या पप्पांनी गणपती आणलाय’ गाण्याचे खरे स्टार
वडापाव बनवणार्या हातनं केलीये कमाल
दोन-तीन आठवड्यांपासून सगळ्यांच्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर एका चिमुकल्या मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ते गाणं म्हणजे ’आमच्या पप्पांनी गणपती आणलाय गणपती’ हे गाणं. या गोड गाण्यानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. लहाण म्हणून नका, वयस्कर मंडळी सगळेच या गाण्यावर रील्स बनवून अपलोड करताना दिसतायत. हा व्हायरल व्हिडिओ आहे साईराज केंद्र या चार वर्षाच्या चिमुकल्याचा. परळीतल्या या मुलाचा निरागस पणा सगळ्यांना वेड लावतोय.
साईराजचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजू लागलं. सुरुवातीला साईराज हाच या गाण्याचा गायक आहे, म्हणजे साईराजनंच हे गाणं गायलंय असं वाटलं होतं. पण गाणं व्हायरल झालं आणि या गाण्याच्या खर्या गायकांचा शोध सुरू झाला. आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं प्रत्येकाच्या तोंडी होतं. पण या गाण्याचे गीतकार आणि खरे गायक मात्र भिवंडीच्या एका गावात आपलं गाणं व्हायरल होताना फक्त पाहत होते. साईराज व्हायरल झाला पण ज्या चिमुकल्यांच्या आवाजातलं हे गाणं आहे ते मात्र कौतुकाची आस लावत बसले होते. अखेर आता या गाण्याचे खरे स्टार समोर आले आहेत.
तर आमच्या पप्पांनी आणला गणपती या गाण्याचे गीतकार आहेत भिंवडीतच्या राहनाळ या गावातील मनोज घोरपडे. तर त्यांच्या मुलांनीच या गाण्याला गोड आवाज दिलाय. मोहित घोरपडे आणि शौर्या घोरपडे अशी या चिमुकल्या गायकांची नावं आहेत. साईराजचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे गाणं सगळ्यांच्या तोंडी आलं. पण खरं तर हे गाणं घोरपडे वर्षभरापपूर्वीच रेकॉर्ड केलंय. तसंच याचा अल्बमही त्यांनी दोन वर्षांपूर्वीच युट्यूबवर अपलोड केलाय. पण तेव्हा तो व्हायरल झाला नाही.
मनोज घोरपडे यांना लिखाणाची आवड आहे. पण उदरनिर्वाहासाठी ते वडापावची गाडी चालवतात. गपणतीत इतकी नवीन गाणी येतात, तसं आपणही एखादं गाणं लिहावं असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी हे गाणं लिहिलं. हे गाणं त्यांनी चार-पाच वर्षांपूर्वीच लिहिलं होतं. तर गेल्यावर्षी रेकॉर्ड केल्याचं त्यांनी सांगितलं. गाणं लिहिल्यानंतर हे गाणं लहाण मुलांनी गायलं तर जास्त छान वाटेल, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांकडून तयारी करून घेतली आणि गाण रेकॉर्डही केलं.
साईराजमुळं आपल्या लेकरांचा व्हिडिओ देशभर गाजतोय, म्हणून मनोज यांनी त्याचं अभिनंदन केलंय. पण आपल्या मुलांची कला, आपल्या लेकरांचं कौतुक व्हायला उशीर झाल्याची खंतही ते व्यक्त करतात. गेल्या वर्षी अपलोड झालेल्या या गाण्याला वर्षभरात दोन मिलियन व्हूज मिळाले होते.पण साईराज केंद्रेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती संख्या तब्बल सहा मिलियन व्हूज वर जाऊन पोहचली आहे.
४ वर्षांचा साईराज आता सोशल मीडिया स्टार झालाय. तो बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात कन्हेरवाडी या गावात राहातो.साईराज नुकताच राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीला गेला होता. अनेक कार्यक्रमांना तो हजेरी लावताना दिसतो