गेवराईत पारंपरिक लावणी प्रशिक्षण वर्गाचे पत्रकार विनोद नरसाळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

गेवराईत पारंपरिक लावणी प्रशिक्षण वर्गाचे पत्रकार विनोद नरसाळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
लावणीसेवक तसेच महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार पोहचविणारा शिवम इंगळे याने तीन दिवसीय पारंपरिक लावणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. शहरातील ड्रिम फिटनेस सेंटर याठिकाणी पत्रकार विनोद नरसाळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व पुजन करुन या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात करण्यात आले.
महाराष्ट्र आणि त्याची संस्कृती ही जगप्रसिद्ध आहेच. तसेच महाराष्ट्राची लोककला आणि त्याच लोककलेतील अस्सल मराठीची ठसकेबाज लावणी ही तमाम महाराष्ट्रातील मराठी जनांची अस्मिता देखील आहे. ह्याच लोककलेची शिवम विष्णू इंगळे या तरुणाला मोठी आवड आहे. तो लावणीतच आपले भविष्य समजतो. त्याने राज्यात विविध ठिकाणी आपल्यात असलेल्या कलेचे अथांग परिश्रमाने लोककलेचे सादरीकरण करुन प्रेषकांची मने जिंकलेली असून त्याने युवा लावणीसम्राट म्हणून आपली जगभर ओळख निर्माण केलेली आहे. दरम्यान त्याची लावणी सादर करण्याची कला पाहून ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने दखल घेऊन नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी व महाराष्ट्राची लोककला देशात पोहचविण्यासाठी निवड करुन संधी दिली होती. दरम्यान गेवराई जवळील बालग्राममध्ये 30 मार्च 2023 रोजी शिवम याने नाँन स्टाँप तब्बल 26 तास लावणी सादर करून नव्या वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातलेली आहे.
दरम्यान शिवम याने महाराष्ट्राच्या या लोककलेचे संवर्धन करण्याकरिता एक खारीचा वाटा म्हणून सध्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करत आहे. त्याने गेवराई शहरात पारंपारिक लावणी नेमकी काय असते ? व ही लोककला अशीच टिकून राहण्याकरिता 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान तीन दिवसीय नृत्य प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. यामध्ये पारंपारिक लवणीचे योग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेला राजाश्रय मिळवून देण्याकरिता चला प्रयत्न करूयात म्हणून
या प्रशिक्षण वर्गाचे गेवराई शहरातील ड्रिम फिटनेस सेंटर याठिकाणी तीन दिवसीय पारंपरिक लावणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून पत्रकार विनोद नरसाळे यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुजन करुन या प्रशिक्षण वर्गास शिवम इंगळे यांनी सुरुवात केली. यावेळी प्रशिक्षण वर्गाचे आयोजक शिवम इंगळे, विद्यार्थींनी, महिला यांची उपस्थिती होती.