एकल महिला संघटनेच्या अध्यक्षा मंगल जाधव यांना साई अर्पण फाउंडेशन च्या वतीने समाजभूषण पुरस्कार
एकल महिला संघटनेच्या अध्यक्षा मंगल जाधव यांना साई अर्पण फाउंडेशन च्या वतीने समाजभूषण पुरस्कार
टाकळीभान प्रतिनिधी -टाकळीभान येथील एकल महिला संघटनेच्या अध्यक्षा मंगल रामकृष्ण जाधव यांना साई अर्पण फाउंडेशन च्या वतीने समाजभूषण पुरस्कार देण्यात आला,
शिर्डी येथे साई पालखी निवारा येथे, साई अर्पण फाउंडेशन च्या वतीने संत पूजन सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले होते, यावेळी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले,
मंगल जाधव यांनी एकल महिलांचे संघटन करून त्यांच्या विविध प्रश्नावर शासन दरबारी आवाज उठून पाठपुरावा करत आहे, या कार्याबद्दल साई अर्पण फाउंडेशन च्या वतीने मंगल जाधव यांना,समाजभूषण पुरस्कार माजी, खासदार भाऊसाहेब वाकचौरे व ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या कोपरगाव संचालिका सरला दिदीजी, ब्रह्मकुमारी चैताली दीदीजी कोपरगाव, यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान सन्मानित करण्यात आला आहे,
तसेच टाकळीभान येथील यावेळी कल्पना कोकणे, संगीता जोशी, अर्चना मावळे ,छाया लांडगे, यांचाही सन्मान करण्यात आला आहे,
या पुरस्कार व सन्मान मिळाल्याबद्दल माजी सभापती नानासाहेब पवार, अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंखे, कारेगाव विभागाचे संचालक शिवाजी शिंदे, सरपंच अर्चना रणवरे उपसरपंच कानोबा खंडागळे, मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे, राजेंद्र कोकणे, विलास दाभाडे, अंगणवाडी सुपरवायझर खेडकर मॅडम, सेवानिवृत्त सुपरवायझर मंगला राजाळे, एकल महिला संघटनेचे उपाध्यक्ष मंगल खरात, व टाकळीभान ग्रामस्थ वतीने अभिनंदन करण्यात येत आहे ,