अतिक्रमण करणाऱ्या ग्राम. सदस्य व कार्यकर्त्यास ग्रामस्थांनी दिला चोप
अतिक्रमण करणाऱ्या ग्राम. सदस्य व कार्यकर्त्यास ग्रामस्थांनी दिला चोप
टाकळीभान प्रतिनिधी – चक्क कृषी खात्याच्या शासकीय जागेच्या हद्दीत ग्रामपंचायतचे काही विद्यमान सदस्य व सामाजिक कार्यकर्ते या गाळे माफियांनी तार कंपाऊंड तोडून अतिक्रमण करून पुढील बांधकामासाठी बांधकामाचे साहित्यसह बांधकाम सुरू करण्याच्या तयारीत होते. उपसरपंच कान्हा खंडागळे व इतर ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा अतिक्रमणाचा डाव उधळून लावला.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे कृषी खात्याचे मंडळ कार्यालय ऑफिस असून त्या भोवती मोठे तार कंपाऊंड उभे होते त्या ठिकाणी काही विद्यमान सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मंगळवार दिनांक 05 मार्च 2024 रोजी 11.30 ते 12.00 या दरम्यान तिथे येऊन तेथील उभे असलेले तार कंपाउंड तोडून जेसीपी लावून त्या जागेची साफसफाई करून त्या जागेवर बांधकाम सुरू असताना टाकळीभानचे उपसरपंच कान्हा खंडागळे हे त्या ठिकाणी येऊन सुरू असलेले बांधकाम ताबडतोब बंद पाडले ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आणून भविष्यात कोणालाही गावात अतिक्रमण करू देणार नाही व झालेले अतिक्रमण पाडल्याशिवाय राहणार नाही भविष्यात जो अतिक्रमण करेल त्याच्यावर ग्रामपंचायत च्या मार्फत रीतसर पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा वजा देत या गाळे माफीयांनी कोणत्या ठिकाणी अतिक्रमण करावे याचे भान या गाळे माफियांना राहिलेले नाही जनतेने तुम्हाला गावाच्या विकास कामासाठी निवडून दिलेले आहे गावात अतिक्रमण करून गाळे बांधून व स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी नव्हे टाकळीभानची जनता तुमच्या तोंडात शेण घातल्यावर शिवाय राहणार नाही असेही कान्हा खंडागळे यांनी जनतेस बोलून दाखवले
पण गावाच्या प्रथम नागरिक असलेल्या सौ अर्चनाताई रणनवरे ह्या काय भूमिका घेतात व कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले असून पण सरपंच पदाचे सर्व काम त्यांचे पतीदेवच पाहतात अशीही चर्चा गावात सध्या सुरू असल्यामुळे विरोधकांनी अतिक्रमण केले असते तर ते मान्य झाले असते पण सत्ताधाऱ्यांनीच अतिक्रमण केल्यामुळे अतिक्रमणाचा ग्रामपंचायतीला घरचाच आहेर मिळाला आहे.
उपसरपंच खंडागळे यांनी गावाच्या हितासाठी रोष पत्करून व विद्यमान सदस्य यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे गावात भू माफियांवरून गावात दंगल सदृश वातावरण निर्माण झाले. खंडागळे यांनी एका गाळे माफिया सदस्याला चांगलाच प्रसाद दिला तसेच स्वतःला स्वयंघोषित कार्यकर्ते समजून घेणारे गाळे माफिया यांनी काढता पाय घेतला हे होणारे अतिक्रमण थांबवल्याबद्दल सुज्ञ ग्रामस्थांनी कान्होबा खंडागळे यांचे आभार मानले.
कृषी सहाय्यक धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यानं कृषी खात्याच्या आजची जागेत कोणी अतिक्रमण केल्यास त्यावर कायदेशीर पोलीस कारवाई करण्यात येईल तालुका पोलीस स्टेशनला देणार आहे.
शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून दाखल झालेल्या तक्रारीवर अपात्र होता होता बचावलेले ग्रा.सदस्य सहा महिने होत नाही तोच शासकीय जागेवर अतिक्रमण करत आहेत गावचे रक्षकच भक्षक होत असल्याचा हा प्रकार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.