पढेगाव येथील अल्पवयीन मुलीची लज्जा उत्पन्न होईल अशी छेड काढणाऱ्या आदिल शेखच्या मुसक्या आवळून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत व एट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर सोमवारी पढेगाव गाव बंदची घोषणा सकल हिंदू समाजाने केली आहे
पढेगाव येथील अल्पवयीन मुलीची लज्जा उत्पन्न होईल अशी छेड काढणाऱ्या आदिल शेखच्या मुसक्या आवळून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत व एट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर सोमवारी पढेगाव गाव बंदची घोषणा सकल हिंदू समाजाने केली आहे
श्रीरामपूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील पढेगाव येथील अल्पवयीन मुलीची लज्जा उत्पन्न होईल अशी छेड काढणाऱ्या आदिल शेखच्या मुसक्या आवळून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत व एट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर सोमवारी पढेगाव गाव बंदची घोषणा सकल हिंदू समाजाने केली आहे.* श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पढेगावात घडलेल्या या घटनेची सविस्तर माहिती अशी की,पढेगाव येथे राहणारी गरीब कुटुंबातील अवघ्या बारा वर्षीय इयत्ता पाचवीत शिकणारी मुलगी घरामागील काटवणात शौचास गेली असता त्याठिकाणी आदिल शेख नावाचा नराधमाने तिच्या वयाचाही विचार न करता तिला लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक केली.त्यामुळे घाबरलेली अल्पवयीन मुलगी भेदरून पळत घरी आली व घडलेला सर्व प्रकार आज्जीला सांगितला मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून मुलीच्या आज्जीने थेट आरोपीच्या घरी जाऊन याबाबत जाब विचारला असता आरोपी आदिल त्याच ठिकाणी होता त्याला पिडीत मुलीने लागलीच ओळखले. त्यावरून मुलीच्या आज्जीने ही खबर तालुका पोलिसांना दिली आज्जीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गु. र.नं ०१४१/२०२४ नुसार भा.दं. स.३५४,पॉस्को कायद्यांतर्गत कलम ८व१२,व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात येऊन आरोपी आदिल शेख यास ताबडतोब अटक करून तुरुंगात टाकण्यात आले.याप्रसंगी तालुक्यातील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होता. राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे त्याठिकाणी फिर्यादी आज्जीवर व मुलीच्या कुटुंबावर जिहादी प्रवृत्तीचे लोकं दबाव टाकू शकले नाहीत. अल्पवयीन हिंदू मुलींना टार्गेट करून त्यांचे लैंगिक छळ करण्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत असून तो एक चिंतेचा विषय बनला आहे.संगमनेर येथील अल्पवयीन मुलीला दोन महिन्यांपूर्वी पळवून नेऊन आरोपी पोलिसांना सापडत नव्हता पण राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूरातील वार्ड नंबर दोन मध्ये आरोपी मुलीसह असल्याची माहिती पोलिसांना दिल्याने त्या अल्पवयीन मुलीची त्या नराधमाच्या तावडीतून सुटका झाली.असे अनेक प्रकार याअगोदर घडलेले आहेत.लव जिहाद मधून अशा घटना कमी होण्याऐवजी आणखी वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.जोपर्यंत लव जिहाद सारख्या या लांच्छनास्पद घटनांबाबत शासन कठोर कायदा करत नाही तोपर्यंत असे प्रकार कमी होणार नाहीत शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा कायदा हातात घेऊन लव जिहाद मधील आरोपींना सकल हिंदू समाजच शिक्षा देईल अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाल्या.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.