गुन्हेगारी
टाकळीभान येथील विज रोहित्रातील ऑईलसह इतर साहित्याची चोरी

टाकळीभान येथील विज रोहित्रातील ऑईलसह इतर साहित्याची चोरी
टाकळीभान : येथील वीज रोहित्रातील ऑईलसह साहित्य चोरून नेण्याची घटना शुक्रवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आली. टाकळीभान येथील दादासाहेब गायधने यांच्या गट नंबर २७१मधील शेतीच्या बांधावर असलेल्या १०० केव्हीचे रोहित्र अज्ञात चोरट्यांनी पोलवरून खाली पाडले. रोहित्रामधील ऑईलसह क्वाईल, केबल, नटबोल्ट, लोखंडी अँगल असा एकूण २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी भोकर उपकेंद्राचे कर्मचारी कैलास घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.