शहरातील प्रमुख रस्त्यांना पॅच मारून खड्ड्यांची डागडुजी पालिकेने केली पण रेल्वे अंडरग्राउंड पुलाखालील खड्डे तसेच ठेवल्याने दररोज छोटेमोठे अपघात होत आहेत.मोठा अपघात होऊन एखादा बळी जाण्याअगोदर पालिकेने पुलाखालील रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीने आता धरला जोर

शहरातील प्रमुख रस्त्यांना पॅच मारून खड्ड्यांची डागडुजी पालिकेने केली पण रेल्वे अंडरग्राउंड पुलाखालील खड्डे तसेच ठेवल्याने दररोज छोटेमोठे अपघात होत आहेत.मोठा अपघात होऊन एखादा बळी जाण्याअगोदर पालिकेने पुलाखालील रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीने आता धरला जोर
*श्रीरामपूर(प्रतीनिधी):-शहरातील प्रमुख रस्त्यांना पॅच मारून खड्ड्यांची डागडुजी पालिकेने केली पण रेल्वे अंडरग्राउंड पुलाखालील खड्डे तसेच ठेवल्याने दररोज छोटेमोठे अपघात होत आहेत.मोठा अपघात होऊन एखादा बळी जाण्याअगोदर पालिकेने पुलाखालील रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे.*
शहराची मुख्य बाजारपेठ ही मेन रोड व छत्रपती शिवाजी महाराज रस्ता याबाजूला जास्त असल्याने व मुख्य प्रशासकीय कार्यालय व न्यायालय,शाळा,महाविद्यालये पलीकडे असल्याने रेल्वेचे अंडर ग्राउंड पूल हे शहराला जोडणारा खूप महत्वाचा दुवा आहे. बहुतेकांना या मार्गानेच दिवसातून अनेक वेळा जा ये करावी लागत असल्याने काहीवेळा त्याठिकाणी वर्दळ वाढल्याने वाहतूक पुलाखाली तुंबली जाते.दोन्ही बाजूने प्रचंड चढ असल्याने बहुतेक वाहनधारक हे वाहनांना वेग देतात त्यामुळे अपघात होतात तर प्रचंड वर्दळ वाहतुकीच्या दगदगीने पुलाखाली रस्ता अनेक ठिकाणी फुटला आहे तर काही ठिकाणी मोठं मोठाले खड्डे पडल्याने त्याठिकाणी खडडे चुकवायच्या नादात दररोज लहान मोठे अपघात तिथं घडत आहेत तर काहींना पाठीच्या मणक्याचे आजारही त्यामुळे उदभवले आहेत.
शहरातील प्रसिद्ध उद्योजक ,व्यापारी त्यांना याच मार्गाने जावे यावे लागत असल्याने अनेकांना मणक्यांचे आजार जडले आहेत,अनेकांच्या खुब्याचे दुखणे याच पुलाखालील खराब रस्त्यामुळे आणखी वाढल्याने त्याचा परिणाम त्यांच्या उद्योगांवर पडल्याने श्रीरामपूर शहराची आर्थिक स्तिथी त्यामुळे संकटात पडण्याच्या मार्गावर आहे.असा अनेकांना त्या खराब रस्त्याचा अत्यंत त्रास होत असून काहींनी तर त्या रस्त्याने जायचं टाळत बंद केलं आहे.
तरी पुलाखालील रस्ता दुरुस्त करून पायी चालण्या इतपत तरी डागडुजी करून दुरुस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यासह अनेकांनी केली आहे.अन्यथा आंदोलन करावे लागेल असा मागणी वजा इशारा जनतेतून ऐकायला येत आहे.