विज पाणी व रस्ते या मूलभूत सुविधा जर खेडे गावाला मिळाल्या तर त्या गावचा विकास झाल्याशिवाय राहत नाही.. खेडे गाव सुधारला तर देश सुधारल
विज पाणी व रस्ते या मूलभूत सुविधा जर खेडे गावाला मिळाल्या तर त्या गावचा विकास झाल्याशिवाय राहत नाही.. खेडे गाव सुधारला तर देश सुधारल
त्यासाठी गावामध्ये विकास होणे गरजेचे आहे. 80 टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्त्वानुसार शिवसेनेची वाटचाल चालू असून आगामी निवडणुकीमध्ये ते दाखवून देऊ . शिवसेना पक्ष हा रस्त्यावर उतरणारा पक्ष आहे. कितीही संकटे आले तरी पक्ष अजून आहे तसाच आहे.. निष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद असून. तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम करत आहे. आणि कायम करत राहू. शिवसेनेमध्ये कित्येक आले आणि कित्येक गेले परंतु शिवसेना कधी संपलेली नाही आणि संपणार नाही कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सैनिक यामध्ये आहे.असे शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख पै. रावसाहेब खेवरे म्हणाले.. राहुरी तालुक्यातील देशवंडी येथील 84 लक्ष किमतीच्या जिल्हा परिषद जल जीवन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन प्रसंगी श्री खेवरे बोलत होते.. यावेळी डॉक्टर किशोर शिरसाट प्रभाकर शिरसाट कडू भाऊ शिरसाट सोपान शिरसाठ लक्ष्मण शिरसाठ दत्तात्रय पवार उत्तम पवार सरपंच गणेश खेवरे उपसरपंच मंगल ताई माने दत्तू कोकाटे नामदेव कोकाटे राजू शिरसाठ बाबा कलापुरे भास्कर शिरसाट अर्जुन कोकाटे इंगळे मामा उत्तम बर्डे सुचित माने अशोक खरात ग्राम विकास अधिकारी बोटे भाऊसाहेब सौ अर्चना चोभे कनिष्ठ अभियंता राहुरी आधी उपस्थित होते.