गडावर साकारणार छत्रपती शिवरायांचे १५००० स्क्वेअर फूटाचे रेखाचित्र
चित्रकार उद्देश पघळ यांच्या कलाकृतीतून त्वरितादेवी गडावर साकारणार छत्रपती शिवरायांचे १५००० स्क्वेअर फूटाचे रेखाचित्र
गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिराच्या गडावर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चित्रकार उद्देश पघळ राहेरी यांच्या कलाकृतीतून १५००० स्क्वेअर फूटाचे भव्यदिव्य रेखाचित्र सोमवार दि.०६ फेब्रुवारी २०२३ रोजी रेखाटण्यात येणार असून हे रेखाचित्र केवळ दोन तासात साकारण्याचा संकल्प चित्रकार उद्देश पघळ याने केला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिराच्या गडावर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भवितव्य १५००० स्क्वेअर फूटाचे रेखाचित्र सोमवार दि.०६ फेब्रुवारी रोजी केवळ दोन तासात साकारण्यात येणार असून हे काम लोकसहभागातून केले जाणार आहे. तरी तलवाडा व पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिकांनी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी रविवार दि.०५ फेब्रुवारी व सोमवार दि.०६ फेब्रुवारी २०२३ असे दोन दिवस श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिराच्या गडावर श्रमदानातून साफसफाई करण्यासाठी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ग्रामीण भागात पहिल्यांदाच शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे भवितव्य असे रेखाचित्र रेखाटले जाणार आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चित्रकार उद्देश पघळ याने बीड जि.प.चे माजी अध्यक्ष – विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून आर.बी.अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर पंधरा हजार स्क्वेअर फूटाचे रेखाचित्र रेखाटले होते. तसेच गेल्या महिन्यात राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंतीनिमित्त कर्जत-जामखेड मतदार संघाचे आ.रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून राजमाता जिजाऊंचे १५००० स्क्वेअर फूट रेखाचित्र तयार करून ग्रामीण भागातील चित्रकार उद्देश पघळ याने जागतिक विक्रम केला आहे. आता ग्रामीण भागात तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिराच्या गडावर दर्शनी भागात लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे भवितव्य असे १५००० स्क्वेअर फूटाचे रेखाचित्र सोमवार दि.०६ फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रकार उद्देश पघळ यांच्या कलाकृतीतून रेखाटले जाणार आहे. तरी तलवाडा व पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिकांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी टिकाव, फावडे, कुदळ, टोपली आदी साहित्य सोबत घेऊन साफसफाई आणि श्रमदान करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.