१ कोटी २२हजार रूपये अतीवृष्टी नुकसान भरपाई रक्कम टाकळीभानला मंजूर

१ कोटी २२हजार रूपये अतीवृष्टी नुकसान भरपाई रक्कम टाकळीभानला मंजूर
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील ११६३ शेतकर्यांना एकूण ७१८ हेक्टर क्षेत्रासाठी १ कोटी २२हजार रूपये अतीवृष्टी नुकसान भरपाई रक्कम टाकळीभानला मंजूर झाल्याची माहिती कामगार तलाठी कचेश्वर भडकवाल यांनी दिली आहे.
टाकळीभान परीसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याचे आदेश सरकारने दिले होते त्यानुसार येथे पंचनामे सुरु असतांनाच येथील राजकारणामुळे कामगार तलाठी अरूण हिवाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे पंचनाम्याचे काम ठप्प झाले
होते. तलाठी हिवाळे यांनी १०३५ महसूल बाधित शेतकऱ्यांच्या सोयाबीन व काही बाधित क्षेत्रावरील कपाशी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे केले होते.
१०३५ शेतकर्यांपैकी सुमारे ७७९ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होवून ५८ लाख रूपये नुकसान भरपाई रक्कम मंजुर करण्यात आली त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्या पासून येथील अनेक शेतकरी वंचित राहिले होते. त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकर्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती.
येथील प्रभारी तलाठी भडकवाल यांनी वंचित
राहिलेल्या शेतकर्यांची यादी करून पाठविल्यानंतर
उर्वरित ३०८ शेतकर्यांना ३०८ हेक्टर क्षेत्रासाठी
४२ लाख २२ हजार रूपये मंजूर झालेले आहे.
पहिल्या यादीत ७७९ शेतकर्यांना ४१० हेक्टर क्षेत्रा साठी ५८ लाख रूपये तर दुसर्या यादीत ३८४ शेतकर्यांना ३०८ हेक्टर क्षेत्रासाठी ४२ लाख २२ हजार असे एकूण १ कोटी २२ हजार रूपये नुकसान
भरपाई टाकळीभानला मंजुर झाली आहे.
टाकळीभान हे संपूर्ण बागायत क्षेत्र असल्याने हेक्टरी रुपये २७ हजाराप्रमाणे भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र १३ हजार ७०० प्रमाणे नुकसान भरपाई मिळाली असल्याने शेतकर्यां मधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.