श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचा १४ कोटी २० लाख रुपयाचा अर्थसंकल्प सादर

श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचा १४ कोटी २० लाख रुपयाचा अर्थसंकल्प सादर
श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२३-२४ या वर्षीचा १४ कोटी २० लाख रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला असुन या अर्थसंकल्पात अनेक विकास कामे हाती घेण्यात आलेली आहे प्रशासकांच्या कार्यकाळात बाजार समीतीचा नफा तसेच ठेवीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीने सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला असुन प्रशासकाच्या कार्याकाळात बाजार समीतीच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे माहे डिसेंबर २०२१ अखेर समीतीला ५लाख ८३ हजार रुपये नफा होता तर माहे डीसेंबर २०२२ अखेर ४५ लाख रुपये नफा झालेला आहे तर माहे आँक्टोंबर पर्यत मुदत ठेवी ४५ लाख होत्या .जानेवारी २०२३ अखेर या ठेवी १ कोटी २० लाख इतक्या झालेल्या आहेत प्रशासकांनी पुढील काळात अनेक विकास कामे हाती घेतलेली असुन सी एन जी पंप उभारणी जनावरांचा बाजार पूर्ववत चालु करणे ,मोकळा कांदा खरेदीसाठी जमीन खरेदी करणे ,बेलापुर उपबाजार आवारात २८ दुकानगाळे व १४ गोडावुन असे २ कोटी ५० लाख रुपयाचे काम प्रागती पथावर आहे महाराष्ट्र शासनाकडून शेती महामंडळाच्या उर्वरीत ५० एकर जमीन खरेदीचा प्रस्ताव प्रशासाकांनी तयार केलेला आहे तसेच श्रीरामपुर बाजार समीतीतील मेन गेट ते कांदा मार्केट रोड काँक्रिटीकरणासाठी रुपये १२ लाख कांदा मार्केट रोड काँंक्रीटीकरणासाठी रुपये ७० लाख मुख्य बाजार समीतीत शाँपींग सेंपर करीता रुपये २ कोटी ५० लाख भाजीपाला मार्केट दुकानगाळे रुपये ४०लाख बेलापुर उपबाजार शाँपींग सेंटर १ कोटी १५ लाख बेलापुर रोड अंतर्गत काँक्रीटीकरण रुपये ६५ लाख ,टाकळीभान रोड काँक्रीटीकरण रुपये १ कोटी १० लाख या प्रमाणे एकुण ७ कोटी ७० लाख रुपये खर्चाची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे बाजार समीतीचे प्रशासक दिपक नागरगोजे व बाजार समीतीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्या कार्यकाळात बाजार समीतीच्या उत्पन्नात तसेच वैभवातही वाढ होत आहे शेतकरी व्यापारी वर्गांना मिळणाऱ्या सुविधातही वाढ झाली असुन शेतकरी व्यापारी बंधुनी प्रशासक नागरगोजे व प्रभारी सचिव वाबळे यांना धन्यवाद दिले आहेत