वारकरी दुखावले प्रशासनाच्या अडमुठेपणाचा प्रताप. पालखी सोहळ्यातील पहिल्यांदाच घडली अशी दुर्दैवी घटना

वारकरी दुखावले प्रशासनाच्या अडमुठेपणाचा प्रताप. पालखी सोहळ्यातील पहिल्यांदाच घडली अशी दुर्दैवी घटना
देहू येथील संत तुकाराम महाराजांचे प्रस्थान होणार होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रस्थान सोहळ्यासाठी आगमन होणार होते अशी पार्श्वभूमी असताना पोलीस प्राचीतानाने कडेकोट बंदोबस्त करत सुमारे तीन तास पालखी प्रस्थान होण्यापासून रोखली. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येणार या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पालखी सोहळ्याचा प्रस्थान थोडा लांबला आणि केंद्राचींगरी होऊन किरकोळ जखमी म्हणून तीन महिलांना इजा झाली.
पालखी प्रस्थान मंदिरातून होण्यापासून रोखण्यात आल्याने रथाच्या पुढे असणाऱ्या दिंड्या रस्त्यावरच खोळंबल्या. परिणामी गर्दी वाढत राहिली आणि प्रशासनाच्या आडमुठ्यापणाने वारकरी मात्र प्रचंड दुखावले. वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणात पालखी प्रस्थान होत असताना कधीही प्रशासनाने दखल घ्यावी अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. त्याचबरोबर वारकरी हे गुण्यागोविंदाने विठू माऊलीचा गजर करत. वारी करत असतात. यामध्ये कधीही प्रशासनाने दखल घ्यावी अशी परिस्थिती नसते. मात्र प्रशासनाचा प्रोटोकॉल पाळता पाळता वारकऱ्यांच्या हृदयाला मात्र ठेच बसली.
प्रस्तानाला कारण नसताना तीन तास रोखून ठेवल्यामुळे पुढील नियोजन बिघडले. गोरगरीब वारकरी मात्र यामुळे प्रचंड दुखावलेला आहे. दरम्यान उशिराने संत तुकाराम महाराजांचे पंढरपूर कडे प्रस्थानही झाले आहे. मात्र वारकरी सांप्रदायाच्या इतिहासामध्ये अशी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच घडली. मुख्य केंद्रबिंदू असणारा वारकरी त्यांच्या दिंड्या या अडवल्या गेल्यामुळे वारकरी प्रचंड संतापलेले दिसून येत आहे. महाराष्ट्रात पुढील काळामध्ये हा मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी तीन तास प्रस्थान उशिराने होणे आणि त्याचा परिणाम प्रस्थान सोहळ्यावर होऊन वारकऱ्यांच्या दिंड्यांवर होणे हा इतिहास कधी न घडलेला पाहायला मिळाला. प्रशासनाच्या आड मुठेपनाची किंमत वारकऱ्यांच्या हृदयाला लागलेल्या ठेचामुळे भरावी लागेल अशी परिस्थिती आहे. प्रशासनाच्या आठ मोठेपणाच्या कृत्यामुळे वैष्णवांच्या या मेळ्यामध्ये पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली असे म्हणावे लागेल. दरम्यान केंद्राचींगरी मध्ये मोठी जीवित हानी कुठली झालेली नसून तीन महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे



