अपघातगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नांदेडच्या प्रवाशाचा श्रीरामपूरमध्ये खून करणाऱ्या आरोपीस 24 तासात अटक. श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई.

खूना सारखा गंभीर गुन्हा कुठलेही धागे दोरे नसताना 24 तासाच्या आत उघडकीस आणला.

नांदेडच्या प्रवाशाचा श्रीरामपूरमध्ये खून करणाऱ्या आरोपीस 24 तासात अटक. श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई.

 

दिनांक 04/10/2024 रोजी सांयकाळी 05/30 वा. सुमारास पोनि. नितीन देशमुख  यांना माहिती मिळाली की, श्रीरामपूर ते संगमनेर जाणारे रोडवरील नांदुर ता. राहता ग्रामपंचायत तळयाजवळ रोडच्या कडेला असलेल्या गवतामध्ये एक पुरुष जातीचे बेवारस प्रेत पडलेले मिळुन आले होते. मयताचे डोक्यावर तसेच मानेवर गंभीर दुखापती झालेल्या दिसुन आल्या होत्या त्यावरुन नमुद मयतास कोणीतरी गंभीर दुखापती करुन त्याचा खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले. आजुबाजुच्या परिसरात मयताबाबत चौकशी करता त्याची ओळख पटून आली नाही. त्यामुळे तांत्रीक माहितीच्या आधारे शोध घेतला असता यातील मयताचे नाव नितेश आदिनाथ मैलारे, वय 28 वर्षे, रा. पाखंडेवाडी, ता.मुखेड जि. नांदेड असे असल्याचे निष्पण झाले. त्यावरुन मयताचे वडील आदिनाथ मैलारे यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 932/2024 बी.एन.एस.2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर,  वैभव कलुबमें , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर तसेच पोनि. दिनेश आहेर  स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचे चार पथके तयार करुन तात्काळ तपासकामी रवाना करण्यात आले होते. मयताचे नातेवाईक, मित्र तसेच इतर संबंधीत व्यक्ती यांचेकडे सखोल चौकशी करुन तसेच तांत्रीक माहितीचे विश्लेषण करुनही यातील मयताचा खून कोणी केला याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती. तपासा दरम्यान गोपणीय बातमीदाराकडुन माहिती प्राप्त झाली की नमुद मयत नितेश मैलारे यांचा खून बाभळेश्वर परिसरातील पिकअप चालक देवा याने केला आहे. सदर माहितीच्या आधारे पिकअप चालक देवा याचेबाबत तपास करुन पोलीस पथकांने इसम नामे त्रऋषिकेश ऊर्फ देवा रेवनाथ बरवट, वय 25 वर्षे, धंदा- चालक, रा. केलवड खुर्द, ता. राहाता जि. अहमदनगर यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे सखोल विचारपूस करता त्याने मयत नितेश मैलारे याचा खून केल्याची कबुली दिली.

 

यातील मयत इसम हा वांळूज जि.छ. संभाजीनगर येथे एका कंपनीत काम करीत होता. आरोपी ऋषिकेश ऊर्फ देवा रेवनाथ बरवट हा पिकअप चालक असुन तो दिनांक 02/10/2024 रोजी त्याचे मालकाची पिकअप गाडी घेवुन आर्णी जि. यवतमाळ येथे तुरीचे पोते पोहचविण्याकरीता गेला होता. दि. 03/10/2024 रोजी सकाळी तुर पोहचवल्यानंतर दुपारी तेथुन निघुन रात्री वांळुज जि.छ. संभाजीनगर येथे आला. तेथे यातील मयत नितेश मैलारे यांने त्याला पुणे येथे मित्रांणा भेटायला जायचे असल्याचे सांगुन आरोपी ऋषिकेश याचेकडे नेवासा फाट्यापर्यंत लिफ्ट घेतली. प्रवासादरम्यान त्यांच्यात मैत्री होवुन ते रस्त्यात एका बारमध्ये दारु पिले. त्यानंतर मयत नितेश मैलारे यांने पुणे येथे जाण्याचे रद्द करुन तो आरोपी ऋषिकेश सोबत त्याचे पिकअप गाडीत शिर्डी येथे येण्यासाठी निघाला. त्यानंतर रस्त्यात ते दोघे पुन्हा दारु पिले व शिर्डीच्या दिशेने प्रवास करु लागले. मयत नितेश मैलारे याने शिल्लक राहिलेली दारूची बॉटल सोबत घेवुन पिकअप गाडीत ठेवली होती.

श्रीरामपूर शहराच्या पुढे गेल्यानंतर दारुच्या नशेत त्या दोघांमध्ये पिकअप गाडीतच वाद होवुन शिवीगाळ व हाणामारी चालु झाली त्या रागात आरोपी ऋषिकेश बरवट याने गाडीतील लोखंडी जॅक मयत नितेश मैलारे याचे डोक्यात मारला तसेच गाडीत ठेवलेली दारुची बॉटल फोडुन ती मयत नितेश याचे मानेजवळ खुपसली त्यात मयत नितेश गंभीर जखमी होवुन बेशुध्द झाला त्यामुळे आरोपी ऋषिकेश बरवट याने घाबरुन जावुन नांदुर शिवारात घटनास्थळी गाडी रोडच्या कडेला उभी करुन मयत नितेश याला गाडीतुन बाहेर झुडपात ढकलुन दिले व पिकअप घेवुन त्याचे घरी निघुन गेला अशी हकिगत आरोपी ऋषिकेश बरवट याने सांगुन गुन्हयाची कबुली दिली असुन गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे. श्रीरामपूर शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशिने तपास करुन नमुद खूना सारखा गंभीर गुन्हा कुठलेही धागे दोरे नसताना 24 तासाच्या आत उघडकीस आणला आहे.

 

सदरची कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर व वैभव कलुबर्मे  अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तसेच बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, पोनि. दिनेश आहेर  स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली  नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, परि. पोलीस उपनिरीक्षक/ दिपक मेढे, पोना/रघुवीर कारखेले, पोना/ किशोर औताडे, पोना/ शरद अहिरे, पोकों/ राहुल नरवडे, पोकॉ/ गौतम लगड, पोकों/ रमिझराजा अत्तार, पोकों/ संभाजी खरात, पोकॉ/अजित पटारे, पोकॉ/ अमोल पडोळे, पोकों/अंबादास अंधाळे, पोकों/अमोल गायकवाड, पोकॉ रामेश्वर तारडे, पोकों/आजिनाथ आंधळे, पोकॉ/ रमेश चौधरी, पोकॉ रमेश रोकडे, पोकों/ कैलास झिने, पोकॉ कुलदिप पर्वत, सफी. राजेश सुर्यवंशी, पोकांचा / बाळासाहेब गिरी, मपोकों/ मिरा सरग, तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथील टिमचे अधिकारी अंमलदार व अपर पोलीस अधीक्षक, श्रीरागपुर कार्यालयातील पोहेकॉ / संतोष दरेकर, पोना/सचिन धनाड, पोना/ रामेश्वर वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. हे करीत आहेत,

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे