पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान रकमेत पन्नास हजारांनी भरीव वाढ-राहुल राऊत

पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान रकमेत पन्नास हजारांनी भरीव वाढ-राहुल राऊत
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- केंद्राच्या पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान रकमेत पन्नास हजारांनी भरीव वाढ झाल्याने ग्रामीण आणि शहरी अनुदान रकमेच्या बाबतीत होणारा भेदभाव आता काहीअंशी कमी होणार आहे.भाजपचे सोशल मिडिया उपजिल्हाप्रमुख राहुल राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून अनुदानाच्या रकमेत ग्रामीण भागावर होणाऱ्या अन्यायाबाबत पत्रव्यवहार केला. त्यांच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.*
ग्रामीण भागावर घरकुल योजनेच्या अनुदान रकमेबाबत शहरी भागाच्या तुलनेने सतत अन्याय होत आलेला आहे.भाजपा सोशल मिडिया उपजिल्हाप्रमुख राहुल राऊत यांनी त्यांच्याकडे आलेल्या अनेक तक्रारींमध्ये ग्रामीण तक्रारी जास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्याबाबतीत ग्रामीण भागातील अनेकांनी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट
घेऊन शासनाकडून मिळणाऱ्या घरकुल योजनेच्या अनुदान रकमेच्या पैशातून घराचे काम अपुरेच होत असल्याच्या तक्रारी केल्याने.राऊत यांनी त्याचा सतत पाठपुरावा करून खालच्या पातळीवर कोणताही अधिकारी दखल घेत नाही म्हणून थेट देशाचे पंतप्रधान यांनाच पत्रव्यवहार करून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची व्यथा पत्रातून मांडल्या.त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,शहरी भागासाठी या योजनेंतर्गत अडीच लाख रुपये मिळतात तर ग्रामीण भागाला एक लाख तीस हजार रुपये मिळत असल्याने ग्रामीण भागासाठी ती रक्कम कमी पडत आहेत.त्यामुळे घरकुलांचे काम ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी रेंगाळलेले असल्याचे पहावयास मिळत आहे.ग्रामीण भाग हा बांधकामाच्या मटेरियल साठी शहरी विभागावरच अवलंबून असल्याने जी बांधकामासाठी लागणारी वस्तू शहरी लाभार्थी घेतो तेथूनच ग्रामीण लाभार्थी वस्ती खरेदी करत असल्याने ग्रामीण लाभार्थ्यांना ती अनुदान रक्कम अपुरी पडत असल्याने ती वाढवल्यास अनुदान रकमेचा पुरेपूर फायदा लाभार्थ्यांना मिळेल असे श्री.राहुल राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.
राऊत यांच्या पत्राची तातडीने दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.राऊत यांच्या प्रयत्नामुळे अनुदानात वाढ झाल्याने ग्रामीण भागातून विशेषतः वडाळा महादेव भागातील लाभार्थीनी राहुल राऊत यांचा आभार मानले आहेत.या योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,या योजनेतील लाभार्थ्यांना वीज मोफत देण्यात येणार असून सोलर पॅनल करिता लागणारी रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे.तसेच महिलांच्या देखील पुरुषांप्रमाणे हे घर नावावर करता येणार असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ न देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत तसेच जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याच्या आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.