ज्योत फाउंडेशन मार्फत योगा शिबिर संपन्न

ज्योत फाउंडेशन मार्फत योगा शिबिर संपन्न
राहुरी शहरांमध्ये प्रथमच ज्योत फाउंडेशन या संस्थेमार्फत श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये भव्य योगा शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून योगा ध्यान याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. काळानुसार विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वाढता मानसिक तणाव व कमी झालेला शारीरिक व्यायाम याचा अभाव यावर संवाद करण्यात आला. ज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष तथा संस्थापक अजित सर आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षण यांच्या संकल्पने मधून आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश सर आढाव तसेच राजू सर पांढरे मॅनेजर आयडीएफसी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष सुरेश थेटे सर उपमुख्याध्यापक संत गाडगेबाबा आश्रम शाळा यांनी कार्यभाग सांभाळला. योगा शिबिरासाठी योगा शिक्षक रंजना मॅडम, ओंकार सर, युवराज सर, अविनाश सर, धनंजय सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले एवरे सर अकॅडमीचे अभिजीत मस्के सर व हर्षदा ताई डुकरे मॅडम यांनी देखील मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक ज्योत फाउंडेशनचे करण जवरे, अमोल पवार, विनायक गर्धे, एडवोकेट राहुल वरुडे, आबासाहेब सागर पवार, अमोल पवार, शुभम गायकवाड ,नयन वाघमारे आकाश गायकवाड, विजय धनेश्वर आदींनी सहकार्य केले.