श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम,राज्यमार्गाचीच कटींग करुन…..

टाकळीभान ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर नेवासा राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या जोरात चालु आहे. टाकळीभान बसस्थानक परीसरात रुंदिकरणाची खोदाई सुरु आसताना एका व्यवसायीकाला वाचवण्यासाठी ठेकेदाराने राज्यमार्गाचीच कटींग करुन व्यवसायीकाची हद्द वाढवण्याचा प्रकार केल्याचे दिसून येत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकारात लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.
राज्यमार्ग क्रमांक ४४ च्या बाभळेश्वर ते नेवासाफाटा या दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या वेगात सुरु आहे. राज्यमार्गावरील टाकळीभान येथे रस्ता रुंदिकरणाच्या खोदाईचे काम सुरु आसताना रुंदिकरणाच्या खोदाईत दुजाभाव केला जात आसल्याचे दिसुन येत आहे. ठराविक व्यवसायीकांच्या मर्जीनुसार दुकानासमोर जागा सोडुन राज्यमार्गाची कटींग केली जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी थेट राज्यमार्गाचीच खोदाई केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आसल्याने कामकाज करताना ठेकेदार कंपणी मनमानी करीत आहे. राज्यमार्गाच्या दर्जेदार कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.