महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलसचिव यांना प्रकल्पग्रस्त भरती बाबत चे निवेदन

महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलसचिव यांना प्रकल्पग्रस्त भरती बाबत चे निवेदन
आज प्रकल्पग्रस्त कृती समिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तसेच राहुरी तालुक्यातील विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या वतीने आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुलसचिव यांना प्रकल्पग्रस्त भरती बाबत चे निवेदन देण्यात आले आज राहुरी तालुक्यातील शेतकरी ज्यांनी आपल्या जमिनी या विद्यापीठ प्रकल्पासाठी दिल्यात चे विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या न्याय व हक्कासाठी मोठ्या संख्येने विद्यापीठ येथे उपस्थित होते शेतकऱ्यांची मागणी ही संविधानिक असून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन हे एवढे मोठे विद्यापीठाचे साम्राज्य उभे केले आहे त्या शेतकऱ्यांना आजही न्याय हे विद्यापीठ प्रशासन देत नाही आज रोजी गट क व गट ड संवर्गातील तेराशे पेक्षा जास्त जागा रिक्त असून या ठिकाणी केदार पद्धतीने विद्यापीठाचे काम काढून घेतले जाते त्यामुळे विद्यापीठाला कामगारांची कमी पडल्यास लगेच ठेकेदारामार्फत भरती केली जाते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विद्यापीठ मध्ये कुटुंबातील एका वारसाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची तरतूद असतानाही हे विद्यापीठ प्रशासन व मंत्रालयीन प्रशासन दर वेळी दुर्लक्ष करते व प्रकल्पग्रस्तांवर नेहमी अन्याय होत आहे आज याच विरोधात विद्यापीठ प्रशासनावर शेतकऱ्यांनी धडक देऊन विद्यापीठ कुलसचिव श्री प्रमोद लहाळे यांना निवेदन दिले निवेदनामध्ये असे सांगण्यात आले की पुढील आठ ते दहा दिवसात विद्यापीठ प्रशासनाने व मंत्रालयीन प्रशासनाने यावर योग्य कार्यवाही करुन तोडगा नाही काढलं व निर्णय नाही घेण्यात आला तर हा विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या कुटुंबासमवेत दिनांक 14 मार्च पासून बेमुदत आमरण उपोषणास विद्यापीठ गेटवर बसतील याची सर्वस्वी जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची असेल असे कृती समितीचे अध्यक्ष श्री संतोष पानसंबळ यांनी सांगितले यावेळी उपाध्यक्ष श्री विजय शेडगे सचिव श्री सम्राट लांडगे तसेच जि. प. सदस्य धनराज गाडे. बाबू बाचकर. श्रीकांत बाचकर. प्रमोद तोडमल मनोज बारवकर अक्षय काळे अमोल धोंडे रवींद्र धामोरे संदीप माने विजय शेडगे राहुल शेटे लक्ष्मीकांत वाघ महेश गागरे रवींद्र गायकवाड योगेंद्र शेडगे प्रवीण गाडेकर पाराजी डोईफोडे आदींसह महिला वृद्ध बालक तसेच अपंग व्यक्ती माने इत्यादी मोठ्या संख्येने तालुक्यातील विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.