वायदंडे कुटुंबाचे घर आगीत जळून खाक; शिवसेना नेते राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग यांची कुटुंबाला भेट व आर्थिक मदत

वायदंडे कुटुंबाचे घर आगीत जळून खाक; शिवसेना नेते राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग यांची कुटुंबाला भेट व आर्थिक मदत
*श्रीरामपूर (प्रतिनिधी):- राहुरी तालुक्यातील चांदेगांव येथील मातंग समाजातील एका कुटुंबाचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले या जळीत प्रकरणी घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू व घरकुलासाठी कष्टाने जमवलेले चाळीस हजार रुपये देखील जळून खाक झालेल्या पिडीत वायदंडे कुटुंबाला शिवसेना नेते व राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग यांनी तातडीची दहा हजाराची मदत करून राजकारणापलीकडे जाऊन मानवता दाखवली.*
काल भरदुपारी शॉर्ट सर्किटमुळे राहुरी तालुक्यातील चांदेगांव गावठाण भागात राहणाऱ्या रामभाऊ वायदंडे यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली काही कळायच्या आत घरातील संसारोपयोगी वस्तू व घरकुलासाठी जमवलेले चाळीस हजार रुपये गावकऱ्यांनी आटोकाट प्रयत्न करूनही आगीच्या भक्षस्थानी गेल्याने उपास्थित गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.चांदेगांव मधील राष्ट्रीय श्रीराम संघांचे कार्यकर्ते ओंकार भांड यांनी याबाबतची खबर तातडीने सागर बेग यांना दिली प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सागर बेग यांनी ताबडतोब चांदेगांव येथे जाऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना करत पिडीत कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात म्हणून सामाजिक बांधिलकी जपत दहा हजार रुपये देऊन मानवतेचा आधार देऊन आणखी मदतीचे आश्वासन दिले.सागर बेग यांच्या मदतीने स्फूरण येऊन चांदेगांव ग्रामस्थानी देखील आपापल्या परीने वायदंडे कुटुंबाला मदत केली.वायदंडे यांच्या घराला आग लागल्याचे समजताच ग्रामस्थ्यांनी अग्निशमन दलाला न बोलावता आग नियंत्रणात आणली.सागर बेग यांच्या सूचनेनुसार प्रशासनाचा पंचनामा ताबडतोब करण्यात आला प्रशासकीय मदत मिळेल तेंव्हा मिळेल पण सागर बेग यांच्या आर्थिक मदतीने पिडीत कुटुंबाला या संकटातही खूप आधार मिळाल्याने चांदेगांव ग्रामस्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.



