क्रिडा व मनोरंजनधार्मिक
खिर्डी येथे जय श्रीराम फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी
खिर्डी येथे जय श्रीराम फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी
टाकळीभान प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथे जय श्रीराम फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,
खिर्डी येथील जय हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
ज्येष्ठ नागरिक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून दहीहंडीची सुरुवात करण्यात आली,गावातील सर्व बाल गोपालांनी ,तसेच गावातील ग्रामस्थांनी व जय श्रीराम फाउंडेशन चे सर्व स्वयंसेवकांनी या मधे सहभागी झाले होते, मोठ्या संख्येने ग्रामस्थ व गोविंदा उपस्थित होते,