चाद्यामध्ये साथीचे आजाराचा फैलाव आरोग्य यंत्रणा कोमात.
प्रतिनिधी मोहन शेगर सोनई.
चाद्यामध्ये साथीचे आजाराचा फैलाव आरोग्य यंत्रणा कोमात.
नेवासा तालुक्यातील चांदा येथे साथीच्या आजाराचा फैलाव वाढत असेल सध्या दवाखाने हाउसफुल असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य यंत्रणा गांभीर्याने पाहत नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्शी निगडित बाब असल्याने ग्रामपंचायत प्रशासन याची गांभीर्याने दखल घेऊन चांदा गावात धूर फवारणी करणे आवश्यक असताना आरोग्य विभागाने याबाबत पत्र देऊन सुद्धा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाकडून याकडे डोळे झाक करण्यात येत आहे .
चांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी हे ट्रेनिंग साठी नागपूरला असल्याने त्यांच्या चार्ज दुसऱ्या डॉक्टरकडे आहे याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही ग्रामपंचायतला पंधरा दिवसापूर्वी फवारणीसाठीचे पत्र दिले होते सध्या आरोग्य विभागामार्फत गावातील पाणीसाठे चेक करण्याचे काम सुरू आहे सध्या डेंगू मलेरिया अशा आजाराचा फैलाव वाढत असून प्रत्येक नागरिकाने आपले येथील पाण्यासाठी स्वच्छ धुऊन काढणे आवश्यक आहे वेळच्या वेळी त्यातील पाणी बदलणे गरजेचे आहे आरोग्य विभागाच्या आशा सेविका मार्फत सर्वेक्षण सुरू आहे सध्या सुरू असलेला आजार डेंगू असून चाद्यामध्ये डेंगू चे किती रुग्ण आहेत हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सांगू शकले नाही त्यामुळे येथील आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे चालत आहे असे यावरून दिसते ग्रामपंचायत प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने हा नागरिकांच्या जीवनाशीच खेळण्याचा प्रकार असून तातडीने ग्रामपंचायतने याची दखल घेऊन धुर फवारणी करावी अन्यथा लवकरच नेवासा पंचायत समितीचे बी डि ओ यांना निवेदन देऊन चांदा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार असल्याचे समजते