एका तलवारीसह एका तरुणास घेतले ताब्यात
एका तलवारीसह एका तरुणास घेतले ताब्यात
आज दिनांक 28 /8 /2024 रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की कनगर गावात इसम नामे इरफान आदम शेख राहणार कनगर हा स्वतःचे कब्जात विनापरवाना तलवार घेऊन दहशत करत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथकास सदर ठिकाणी पंचासह जाऊन कार्यवाही करण्यास सांगितल्याने. पोलीस स्टेशनच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचे कडील असलेल्या तलवारी बाबत विचारले असता त्याने दोन पंचासमक्ष त्याच्या ताब्यातील तलवार काढून दिली. सदर तलवार व आरोपीस पोलीस पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आहे सदर इसमावर भारतीय हत्या कायदा कलम 4 / 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई राकेश ओला . पोलीस अधीक्षक अहमदनगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वात पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, पोहे को विकास वैराळ, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भांड यांनी केली आहे