पाचेगाव मध्ये कृष्ण मंदिरामध्ये दहीहंडी कार्यक्रम उत्साहात

प्रतिनिधी किरण जाधव
पाचेगाव मध्ये कृष्ण मंदिरामध्ये दहीहंडी कार्यक्रम उत्साहात
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे दहीहंडी कार्यक्रमासाठी हजारो भावी भक्तांनी हजेरी लावली होती कार्यक्रमांमध्ये निलेश महाराज रोडे यांचे जाहीर हरिकीर्तन होऊन त्यानंतर दहीहंडी कार्यक्रम व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आमदार शंकरराव गडाख यांचे सुपुत्र उदयन गडाख यांनी धावती भेट दिली या कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण मित्र मंडळ अध्यक्ष आकाश फुल सौंदर उपाध्यक्ष सुरज पवार तसेच सरपंच वामन तूवर उपसरपंच ज्ञानदेव आढाव यांनी केले.
यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी उदयन गडाख यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने श्रीकृष्ण मंदिरासमोर सभा मंडप देण्याची मागणी करण्याचे राहूनच गेले ही मागणी आमच्या मित्र मंडळातर्फे आम्ही लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी प्रसाद फुलसौंदर अमोल फुलसौंदर रवी निशाणी गोकुळ मोरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते