अखेर पाचेगाव फाटा येथील मृतदेहाची ओळख पटली.

प्रतिनिधी किरण जाधव
अखेर पाचेगाव फाटा येथील मृतदेहाची ओळख पटली.
नेवासा तालुक्यातील श्रीरामपूर नेवासा रोड वरती पाचेगाव फाट्याजवळ 16 ऑगस्ट रोजी एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह मिळून आला होता. या हत्याकांडाचा पोलिसांना उलघडा करण्यात यश आले. झाले असे की, चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेने पत्नी आणि तिच्या प्रियकराला या गुन्ह्यात ताब्यात घेतली आहे. मृत व्यक्तीचे नाव अंबादास म्हस्के असे आहे. तर मीना अंबादास मस्के आणि लहू शिवाजी डमरे अशी आरोपींची नावे आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ओळख न पटल्याने मृत व्यक्ती जिल्हा बाहेरील असल्याची शक्यता असल्यामुळे मृताचा फोटो राज्यभरातील पोलीस ठाणे आणि व्हाट्सअप ग्रुप वर पाठवण्यात आले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, सीसीटीव्ही मध्ये घटनास्थळाच्या परिसरात एक चार चाकी कार संशयितरित्या फिरताना आढळून आली. या कारच्या नंबर वरून ही कार अंबादास च्या नावावर असल्याची माहिती प्राप्त झाले वरून अंबादास शी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण फोन बंद येत असल्याने त्याच्या पत्नी मीनाची माहिती घेऊन ती इंदापूर तालुक्यातील लोणी येथे राहत आहे. समजल्यानंतर पोलिसांनी इंदापूर गाठत मीना आणि तिचा प्रियकर डमरे यांना ताब्यात घेतल्या त्यानंतर डमरे कडे चौकशी केली असता डमरे कडून हा प्रकार उघडकीस आला.