मुलांच्या हातातील मोबाईल प्रथम बंद करा वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावा:तुंबारे

मुलांच्या हातातील मोबाईल प्रथम बंद करा
वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावा:तुंबारे
विद्यार्थ्यांना पालकांनी मोबाईल देणे प्रथम बंद करावे.पालकांनी मुलांना
वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी. विद्यार्थ्यांने भविष्यात काय व्हायचे हे विद्यार्थ्यांना ठरवू द्या.पालकांनी आपली इच्छा लादू नका.प्रतिपादन प्रमुख अतिथी गट शिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे यांनी देवळाली प्रवरा येथिल पी.एम.श्री जिल्हा परीषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मंञालयातील सेवानिवृत्त सचिव दत्ता पाटील कडू हे होते.यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतिष वाळूंज,माजी नगरसेवक विश्वास पाटील, पञकार रफीक शेख,गणेश अंबिलवादे, उर्दुचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमर शेख, अजिज शेख,मौलाना अबुबकर शेख,संतोष चोळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे,माजी अध्यक्ष सुनिल शेटे, उपाध्यक्षा शोभा मोरे,रंजना कांबळे, अश्विनी निकाळे,योगिता तरस,अमोल भांगरे, नानासाहेब होले, प्रमोद गाडे,मच्छींद्र सरोदे,केंद्र प्रमुख निलिमा गायकवाड, प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचा शुभारंभ सरस्वती पुजनाने झाला. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन
व पुष्पवृष्टी करून पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख यांनी केले.
यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी तुंबारे म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणात खुप सहकार्य केल्या बद्दल पालक वर्गाचे त्यांनी आभार मानले. स्नेहसंमेलनातुन मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो.भरारी पथकाने शाळेची तपासणी केली.विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली असल्याचा अहवाल आला.विद्यार्थ्यांना पालकांनी मोबाईल देणे प्रथम बंद करावे. पालकांनी मुलांना वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी. विद्यार्थ्यांने भविष्यात काय व्हायचे हे विद्यार्थ्यांना ठरवू द्या.पालकांनी आपली इच्छा लादू नका.असे तुंबारे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कडू यांनी बोलताना सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापनात बदल झाला.नविन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे व व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी डिजीटल शाळा करण्यासाठी 16 संगणक संच बंद पडलेला संगणक विभाग सुरु केला.नविन डिजीटल क्लास रुमचे काम सुरु आहे.विद्यार्थी बाल वयात संगणकाचे धडे गिरवित आहे.शाळा दुरुस्तीसाठी सर्व शिक्षा अभियान व खासदार निधीतुन 24 लाख 50 हजार रुपये निधी मिळाला आहे.काम सुरु करण्याचा अध्यादेशही निघाला आहे. लवकरच काम सुरु होणार आहे. सहा महिण्यात दिड कोटीचे कामे मंजुर झाली आहे.शाळेला शिस्त लागली आहे.शैक्षणिक दर्जा सुधारला जात आहे.असे कडू यांनी सांगितले.
गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते. पारितोषिक वितरण करण्यात आले.चिमुकल्या मुलांनी बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम उतम सादरीकरण केले.
कार्यक्रमचे सुत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे व स्वाती जोशी यांनी केले.जेष्ठ शिक्षिका सुनिता मुरकुटे आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष अंगारखे, असिफ सर, स्वाती पालवे, मिनाषी तुपे,शिवाजी जाधव,भारती पेरणे,सुप्रिया आंबेकर,अर्जुन तुपे,वनिता तनपुरे,लक्ष्मी ऐटाळे,जकिया इनामदार आदी शिक्षकांनी परीश्रम घेतले.