टाकळी भान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुरुकुल शिक्षक पालक मेळावाअतिशय,खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.

टाकळी भान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुरुकुल शिक्षक पालक मेळावाअतिशय,खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
या मेळाव्याचे अध्यक्षीय स्थान श्री. बापूसाहेब पाटील पटारे जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, . या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती टाकळीभान सेवा सोसायटीचे माजी चेअरमन राहुल पटारे, .आनंद रसाळ.पाराजी पटारे, सौ. दिपालीताई मगर, अनिल कांबळे, नारायण काळे, बापू नवले, तसेच सर्व गुरुकुल विद्यार्थ्यांचे पालक व महिला भगिनी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य इंगळे बी.टी. सर यांनी केले. तर गुरुकुल प्रकल्पाचे महत्त्व आणि गुरुकुल अंतर्गत शाळेत चालविले जाणारे विविध प्रकारचे उपक्रम यांची सविस्तर माहिती विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख माननीय बनकर एस. ए. सर यांनी दिली गुरुकुल या उपक्रमाबद्दल पालकांनी सविस्तर चर्चा केली. तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राहुल भाऊ पटारे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या गुरुकुल प्रकल्पाचे कौतुक केले. आणि पालकांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात बापूसाहेब नवले पालक व पत्रकार तसेच माजी उपसरपंच पाराजी पाटील पटारे, माजी .जालिंदर कोकणे नानासाहेब बनकर, किशोर बनकर यांनी आपले विचार मांडले आणि गुरुकुल प्रकल्पाचे कौतुक केले. महिला भगिनींतर्फे सौ.जयश्री ताई पटारे व सौ.सावित्री जंगम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच गुरुकुल पालक आणि विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कुमारी कोमल रावसाहेब रणनवरे व कुमारी पल्लवी भाऊसाहेब बहिरट या विद्यार्थिनींनी आपले गुरुकुल विषयीचे मत मांडून गुरुकुल प्रकल्पाचे महत्त्व स्व अनुभवातून व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. चाबुकस्वार मॅडम यांनी केले. या मेळाव्याची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.