टाकळीभान येथील लक्ष्मीवाडी जि. प. शाळेने शिक्षणातली गुणवत्ता व आस्था टिकवून ठेवली… अशोक नाना कानडे…

टाकळीभान येथील लक्ष्मीवाडी जि. प. शाळेने शिक्षणातली गुणवत्ता व आस्था टिकवून ठेवली… अशोक नाना कानडे…
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान येथील लक्ष्मीवाडी जि.प. शाळेने आपला शिक्षणातील दर्जा टिकवला असून शिक्षणातली गुणवत्ता व विद्यार्थ्यांप्रती शिक्षकांची खरी आस्था ठिकाणी दिसून आल्याचे प्रतिपादन मा. नगरसेवक अशोक नाना कानडे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, केंद्रप्रमुख सरदार पटेल सर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रम प्रसंगी पुढे बोलताना अशोक कानडे म्हणाले की सध्याच्या काळामध्ये शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून गुणवत्ता व शिक्षणाविषयी आत्मीयता असणाऱ्या शाळा पाहायला मिळत नाही. परंतु येथील लक्ष्मीवाडी ची शाळा यास अपवाद आहे.
या शाळेत मोलमजुरी कामगार, आदिवासी, अशी सर्वसामान्य कुटुंबातील मुले असून येथील शिक्षक जीव ओतून, आत्मीयतेने, तळमळीने येथील विद्यार्थी घडवत आहेत. आपल्या मेहनतीने येथील शाळा त्यांनी सुंदर बनवली असून. येथील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ते ज्ञानाचा प्रकाश पाडत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
आमदार लहू कानडे साहेबांच्या निधीतून शाळेला एलईडी संगणक दिला असून आणखी पुढे येथे विद्यार्थ्यांना खेळण्याचे साहित्य देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना येथील शिक्षक नामदेव भालदंड यांनी येथील पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे नेहमी शाळेला सहकार्य असल्याचे सांगितले तसेच शाळेला कमान, व शाळेच्या आवारात पेविंग ब्लॉक बसवण्याची मागणी मान्यवरांना केली. कार्यक्रमानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती पटारे मॅडम यांनी केले. तर आभार शिक्षिका मनीषा कडू यांनी मानले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते अर्जुन राऊत ,भैया पठाण, महेंद्र संत, दिगंबर मगर, बंडोपंत बोडखे, विकास मगर, बापूसाहेब साळवे, , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ रणनवरे, शेख गुरुजी, ज्ञानेश्वर घायाळ, आदींसह ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.