कृषीवार्ता

घटलेले उत्पादन व घसरलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक संकटात

 घटलेले उत्पादन व घसरलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक संकटात

घटलेले उत्पादन व घसरलेले बाजारभाव अशा दुहेरी संकटाचा सामना सध्या कांदा उत्पादक शेतकरी वर्ग करीत असून यामुळे झालेला उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.

एकीकडे महागाईने रौद्र रूप धारण केले आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेला सह इतर वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताने रब्बी हंगामातील कांदा हा गडगडला आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट जुळवणार्‍या कांद्याचे दर घसरल्याने आर्थिक गणिते मात्र कोलमडली आहे. 
बहुंतांशी शेतकरी वर्ग यंदा नगदी पिक म्हणून बघितल्या जाणार्‍या कांदा पिकाकडे वळले. कमी अधिक शेतकर्‍यांनी कांदा लागवडीऐवजी कांदा पेरणीला पसंती दिली. कांदा पेरणी तसेच लागवडी झाल्यानंतर हवे तसे वातावरण या पिकाला मिळाले नाही. परिणामी दुषीत हवामानामुळे कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला. एकरी १२ ते १५ टन निघणारे कांद्याचे उत्पन्न अवघे ५ ते ६ टनापर्यंत निघाले. इकडे उत्पादन घटले असले तरी एका बाजूला रासायनिक खते, किटकनाशकांच्या वाढत्या बाजारभावाने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. 
उत्पादन निम्म्याने घटले असल्याने बाजारभाव चांगले भेटतील अशी आशा शेतकरी वर्गाला असताने ती फोल ठरली. व बाजारभाव गडगडले. १० रूपयाच्या कमी कांदा विकणार नाही अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला असताने कांदा ६,७ व ८ रूपये किलोने विकला जाऊ लागल्याने शेतकर्‍यांचे गणितच कोलमडले. एकरी ४० ते ५० हजार रूपये कांद्यावर करावा लागणारा खर्च व एकूण उत्पादन व बाजारभावाचा विचार करता हे पिक आतबट्ट्याचे ठरले गेले. 
उत्पादन घटलेले असताने सुध्दा बाजारभाव का पडले याबाबत जाणकारांकडून माहीती घेतली असता. उत्पन्न जरी घटले गेले तरी कांदा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले गेल्याचे सांगीतले. त्याचबरोबर पेरलेला कांद्याचा सर्वसमान उतार होत नाही. काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी हा कांदा विरळ होतो. परिणामी क्वालीटी माल निघत नाही व उत्पादन घटले जात असल्याचे बोलले गेले. त्यामुळे भविष्यात कांदा पेरणीऐवजी लागवडीवरच भर देणार असल्याचे बहुतांशी शेतकर्‍यांनी सांगीतले. 
एकंदरीतच घटलेले उत्पादन व कोसळलेल्या बाजारभावाने शेतकरी हातगाईस आला असून आता मात्र कांदा साठवणूकीकडे तो वळला आहे. कांदा साठवणूही किती दर पदरात पडतो हे येणार्‍या काळातच समजणार आहे.
Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे