श्रीरामपुरात मोकळ्या कांदा लिलावास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

श्रीरामपुरात मोकळ्या कांदा लिलावास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोकळा कांदा मार्केटचा आज (दि.१४) मंगळवार रोजी शुभारंभ झाला असून मोकळा कांदा मार्केटला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने शेतकरी हिताचा धोरणात्मक निर्णय घेत शेतकऱ्यांच्या विक्री खर्चात बचत कशी होईल या दृष्टीने उपाययोजना म्हणून बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा मार्केट लिलाव शुभारंभ बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला, यावेळी आज झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला १०५२ पर्यंत उच्चांकी बाजार भाव मिळाला आज झालेल्या लिलाव मध्ये कांद्याला चांगल्या प्रमाणात बाजार भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बाजार समितीचे कांदा विभाग प्रमुख दत्तात्रय थोरात,अजय कासार,वामन मोरगे,संजय सरोदे, शेतकरी नामदेव जगताप, सतीश दुशिंग, अशोक आसने, मोहन होन, गायत्री सरोदे, हिराबाई विखे, मिरण तांबोळी, सुनील साळुंखे, संदीप पिंपळे, अरुण सोमवंशी, दिलीप औताडे, बाजार समितीतील कांदा व्यापारी जितेंद्र गदिया विजय छाजेड रमेश सोनवणे अजय गादिया स्वप्नील चोरडिया महेंद्र गदिया सूर्यकांत जाधव सागर गवारे दिनेश पवार सुनील भांड राजेंद्र नरोडे दीपक गायकवाड किशोर चांडक संजय शेटे पिंटू खाडे मच्छिंद्र मोरे रुपेश कांकरिया बाबासाहेब ढोकचौळे यासह श्रीरामपूर,वैजापूर, गंगापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[ शेतकऱ्यांनी मोकळा कांदा मार्केटचा फायदा घ्यावा – सचिव साहेबराव वाबळे
शेतकऱ्यांच्या विक्री खर्चाची बचत व्हावी याच उद्देशाने श्रीरामपूर बाजार समितीमध्ये मोकळा कांदा मार्केट सुरू करण्यात आले आहे मोकळा कांदा विक्री करताना शेतकऱ्यांचा बारदाना खर्च, वाहतूक आणि भराई खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होत असून शेतकऱ्यांनी मोकळा कांदा मार्केटचा फायदा घ्यावा असे आवाहन श्रीरामपूर बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी केले आहे.]