यशस्वी जीवनासाठी आत्मविश्वास महत्वाचा

यशस्वी जीवनासाठी आत्मविश्वास महत्वाचा
सरदार वल्लभभाई पटेल छावणी परिषद शाळा, भिंगार येथे विध्यार्थ्यांना गणवेश वाटप
यशस्वी जीवनासाठी आत्मविश्वास महत्वाचा गुण आहे. यश शिखर सर करणाऱ्या बहुतेकांमध्ये हा गुण आढळतो. आपले ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल केल्यास जीवनास यशस्वी होता येते. असे प्रतिपादन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले.
भिंगार येथील सरदार वल्लभभाई पटेल छावणी परिषद शाळा येथे गरीब व गरजू विध्यार्थ्यांना मुख्याध्यापक राजू भोसले यांचे चिरंजीव मनोज राजू भोसले यांच्या वतीने छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. डी. एम. मुंडे व स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, गणेश भोर, मुख्याध्यापक संजय शिंदे, मुख्याध्यापक राजू भोसले, मुख्या. मुबीना शेख, माजी मुख्या. मीरा आल्हाट, रोहित परदेशी, पो.कॉ. सचिन धोंडे, सोमेश्वर आव्हाड आदी उपस्थित होते.
आयुष्यात ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करा तुम्हाला यश निश्चित मिळेल असे गौरवोद्गार सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एम. मुंडे यांनी केले.
यावेळी स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले वंचित व गरीब मुलांसाठी मनोज राजू भोसले यांनी मुलांसाठी दिलेले गणवेश कौतुकास्पद आहे. अशा कार्यक्रमांमुळे इतरांनाही प्रेरणा मिळते.