शाळा व्यवस्थापन’च्या अध्यक्षपदी सोमनाथ वाघ मानोरी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापक समितीत फेरबदल

‘शाळा व्यवस्थापन’च्या अध्यक्षपदी सोमनाथ वाघ मानोरी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापक समितीत फेरबदल
मानोरी : राहुरी तालुक्यातील मानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार सोमनाथ वाघ यांची निवड झाली तर, उपाध्यक्षपदी सचिन मकासरे व हरिभाऊ आढाव याची नियुक्ती करण्यात आली.
मानोरी जिल्हा परिषद शाळेत शनिवारी (दि.२२) शाळा व्यवस्थापक समितीची बैठक झाली. त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मानोरी गावचे लोकनियुक्त सरपंच ताराबाई भिमराज वाघ होत्या.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीमध्ये पत्रकार सोमनाथ वाघ हे अध्यक्ष तर, सचिन मकासरे व हरिभाऊ आढाव हे उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निर्णय झाला. तर सचिव मुख्याध्यापक संजय पाखरे सर, सदस्य महेंद्र आढाव, रूपाली गोसावी, दिपाली वाघ, गणेश खुळे, भीष्माचार्य विधाटे, गोवर्धन आढाव, सना सय्यद, आसिफ शेख, शिक्षक प्रतिनिधी पुनम क्षीरसागर, शिक्षकप्रेमी प्रतिनिधी नानासाहेब कांबळे, सेवानिवृत्त पी.आय तथा ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी रेणुका थोरात, विद्यार्थी प्रतिनिधी वेदीका सोनवणे, कृष्णप्रकाश सोडनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष पत्रकार वाघ म्हणाले की, माझी शालेय समितीवर एक मुखाने निवड झाली. याचा मला सार्थ अभिमान आहे. शाळेचा सर्वांगीण विकास व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल राहील. शाळेच्या विधायक कामासाठी व शाळेचे नाव प्रगतीपथावर कसे जाईल यासाठी मी कटिबद्ध राहील.
याप्रसंगी युवा नेते पोपटराव पोटे, युवा नेते बापूसाहेब वाघ, ग्रामपंचायत सदस्य शामराव आढाव, वंचित आघाडीचे बाबासाहेब विश्वनाथ आढाव, पै. संजय डोंगरे, बाबादेव काळे, शिक्षिका शेटे विठाबाई, भोगे ज्योती, जासूद कलावती यांसह आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.