वांगी बुद्रुक मधील अवैध मुरूम वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने?

वांगी बुद्रुक मधील अवैध मुरूम वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने?
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक मधील डी फॉरेस्ट जमिनीमधून अवैध मुरूम चोरी चालू असून या मुरूम चोरांचा बंदोबस्त होईल का? तसेच या चोरांवर कारवाई होणार आहे की नाही? अशी नागरिकांची महसूल प्रशासनाला कळकळीची हाक आहे.
मुरूम माफीयांच्या भातीने कोणीही नागरिक सरकारी मालमत्ता जपण्यास धजावत नसल्याचे या प्रसंगावरून दिसून येत आहे.
संबंधित मुरूम चोर दिवसाढवळ्या जेसीबी व पाच /दहा ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरूम वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने करतात हे ग्रामस्थांच्या विचारापलीकडचे असल्याची ग्रामस्थांची चर्चा चालू आहे विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणावरून मुरूम चोरी होत आहे ते क्षेत्र वांगी बुद्रुक ग्रामपंचायत तिकडे सांभाळण्यासाठी दिलेले आहे तरी देखील मुरूम चोरी कसा झाला असेही बोलले जात आहे. या मागचा मुख्य सूत्रधार कोण? संबंधित मुरूम चोरांच्या साधनांचा व्हिडिओ नागरिकांनी काढलेला आहे . नागरिक स्वतः तो व्हिडिओ जिल्हा अधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित मुरूम चोरांच्या धाकाने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिलेली असून यावर महसूल प्रशासन समाधान कारवाई करेल की नाही जेणेकरून परत हे मुरूम माफिया याकडे ढुंकूनही बघणार नाही या पद्धतीने कारवाई होईल की नाही याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.