महाराष्ट्र

रासपच्या इशाऱ्या नंतर अखेर बारवावरील अतिक्रमण हटवले*

*रासपच्या इशाऱ्या नंतर अखेर बारवावरील अतिक्रमण हटवले*

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली बारवा वर गावातील एका व्यक्तीने बांधकाम करत बारव नष्ट करण्याचा घाट बांधला होता. पण ग्रामस्थांनी या ठिकाणी होत असलेला प्रकार रासप जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांचेकडे केल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणीकरून समंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन अतिक्रमण हटवा अन्यथा पक्षाचे वतीने अंदोलानाचा इशारा दिला होता.
रासप युवा जोडो संकल्प अभियान अहमदनगर जिल्हा दौरा सुरु असताना संगमनेर तालुका बैठकीमध्ये तालुक्यातील समनापूर येथील धनगर समाज बांधव व ग्रामस्थ रासप बैठकीत उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवेवर अतिक्रमण हटावण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार केली असून प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही त्यावर रासपने काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणी केली असता सदर कार्यक्रमामध्येच पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील यांनी जाहीर केले होते की,बैठक संपल्या बरोबर सर्वांनी तहसीलदार कार्यलायकडे जाऊन निवेदन देऊ १५ मे पर्यँत बारवा वरील अतिक्रमण हटवल नाही तर तालुक्याचे आमदार तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घराला घेराव घालू असा इशारा दिला. तहसीलदार कार्यलयात जाऊन तसे निवेदन दिले. तहसीलदार यांच्याशी फोन वरून संवाद साधला १५ मे पर्यँत निर्णय नाही झाला तर आंदोलनावर ठाम असल्याचे कळवले. १२ मे रोजी प्रताधिकारी यांनी आदेश काढून १५ मे पर्यँत अतिक्रमण पाडण्याचे सूचना दिल्या. त्यानुसार अतिक्रमण पाडून बारव खुली करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली बारव ही पुढील पिडीसाठी आदर्श असून त्याचे जतन झाले पाहिजे ही ग्रामस्थानची मागणी या माध्यमातून पूर्ण झाली. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सय्यदबाबा शेख, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, तालुकाध्यक्ष नामदेव काशीद,जिल्हा उपाध्यक्ष सीताराम वनवे,युवक तालुकाध्यक्ष सोपान तांबडे, रभाजी खेमनर,भाऊसाहेब नान्नोर,नानासाहेब जगताप,नंदकुमार खेमनर,शिवाजी शरमाळे, गणेश खेमनर,नवनाथ वावरे,एकनाथ बिडगर, बाळासाहेब वावरे, प्रकाश गायकवाड व ग्रामस्थ
आदींनी मागणी पूर्ण झाल्यामुळे प्रशासनाचे आभार मानले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे