बोरीवली रेल्वे पोलीस ठाणे मुंबई यांची दमदार कामगिरी
बोरीवली रेल्वे पोलीस ठाणे मुंबई यांची दमदार कामगिरी
दिनाक २३/१०/२३ रोजी ०९.२० वा च्या सुमारास फिर्यादी महिला मिनू जैन ५४ वर्षे या ट्रेन मधून गर्दीतून उतरणाना त्यांच्या खांद्याला अडकवलेली पर्स कोणी तरी अज्ञात इसमाने चोरी केली त्यामध्ये १लाख रू रक्कम व १लाख ५० हजार रू चे दागिने असल्याबाबत फिर्याद दिल्याने गु र क्रं १३४१/२३ कलम ३७९ भा द वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास पो उप नि मुलगीर व डिटेक्शन पथकाने तात्काळ सुरु केला व दोन दिवसात संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २लाख ५० हजार रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादी यांच्या ताब्यात दिला असून फिर्यादी यांनी बोरीवली लोहमार्ग पोलीसांचे आभार मानले आहे.सदर कारवाही
वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम
बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे याच्या मार्गदर्शना खाली psi, जयश्री मुलगीर, सहाय्यक पोलीसउप निरीक्षक प्रकाश अर्जुन साळूंखे,पोलीस हावालदार एजाज शेख, पोलीस नाईक गिरी्श पवार, पोलीस शिपाई निलेश देवरुखकर, अमोल चौधरी, नागसेन चौधरी, तुषार पवार, सकट यांनी केली