पाडळसिंगी उड्डाणपुलावर टाटा इंडिगो गाडी पलटी ; दोन जण गंभीर जखमी

पाडळसिंगी उड्डाणपुलावर टाटा इंडिगो गाडी पलटी ; दोन जण गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर हुन बीडच्या दिशेने जात असलेल्या एम.एच.१४ सीएस ८०४९ या टाटा इंडिगो CS गाडीचा अपघात होवून यामध्ये दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना पाडळसिंगीच्या उड्डाणपुलावर घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुंदावाडी येथील तरुण काही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. संभाजीनगर येथून बीड कडे परतताना पाडळसिंगीच्या उड्डाणपुलावर गाडीचा अचानक तोल जाऊन गाडीने चार ते पाच पलट्या घेत अपघात झाला यामध्ये गाडीतील दोन युवक गंभीर जखमी झाले असून यामध्ये गुंदावाडी ता.जि.बीड या गावचे युवक असल्याची माहिती समजते आहे.हा अपघात पाडळसिंगी उडानपुलावर सायंकाळी आठच्या सुमारास घडला असून यावेळी महामार्ग रुग्णवाहिकेने जखमींना बीड जिल्हा रुग्णालय दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी महामार्ग टीमचे प्रतीक कदम, बाळासाहेब काटे, महादेव पवार, सुभाष नन्नवरे आदींनी जखमींना सहकार्य केले.