तिळापूर मध्ये चार जणांकडून मारहाण तसेच हातपाय तोडण्याची धमकी,गुन्हा दाखल.

तिळापूर मध्ये चार जणांकडून मारहाण तसेच हातपाय तोडण्याची धमकी,गुन्हा दाखल.
ऋषिकेश होडगर याला चार जणांकडून मारहाण व हातपाय तोडण्याची धमकी.
ऋषिकेश होडगर याला चार जणांकडून मारहाण व हातपाय तोडण्याची धमकी.
ट्रॅक्टरची शुटिंग मोबाईल मध्ये काढली म्हणून लाकडी दांडा, ऊसाचे टिपरू व लाथा बूक्क्यांनी मारहाण.
आरोपी हे ट्रॅक्टरने उस वाहतुक करीत असताना ट्रॅक्टरची शुटिंग मोबाईल मध्ये काढली. या कारणावरुन आरोपींनी ऋषिकेश होडगर यांना लाकडी दांडा, ऊसाचे टिपरू व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालूक्यातील तिळापूर शिवारात दिनांक २ जानेवारी रोजी घडलीय.
ऋषीकेश बाळासाहेब होडगर, वय २३ वर्षे, राहणार तिळापुर, ता. राहुरी. हा तरूण दिनांक २ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजे दरम्यान त्याच्या शेतात मका लावत असताना तेथे आरोपी हे ट्रॅक्टरने शेत गट नं. १९६ च्या कच्च्या रस्त्याने ऊस वाहतुक करीत होते. तेव्हा ऋषिकेश हा त्याच्या मोबाईलमध्ये ट्रॅक्टरची शुटींग करु लागला.
तेव्हा आरोपी त्याला म्हणाले की, तु ट्रॅक्टरची शुटींग का करतो. असे म्हणुन शिवीगाळ करत ऋषिकेश याला लाकडी दांडा, ऊसाचे टिपरू तसेच लाथा बुक्क्याने मारहान केली. तू परत शेतात आलातर तुझे हातपाय तोडीन, अशी धमकी दिली.
या मारामारीत ऋषिकेश याचा मोबाईल व खिशातील पाकीट कोठेतरी गहाळ झाले. घटनेनंतर ऋषिकेश याने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
ऋषिकेश बाळासाहेब होडगर याच्या फिर्यादीवरून आरोपी १) हारीभाउ भाउसाहेब होडगर २) शिवाजी भिमाजी जाटे ३) भाउराव विश्वनाथ सरोदे ४) प्रविण शिवाजी जाटे सर्व राहणार तिळापुर, ता. राहुरी. या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ११/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.