धनंजय मुंडेंच्या वाहनाला अपघात*

धनंजय मुंडेंच्या वाहनाला अपघात*
अपघात म्हणलं कि सर्वांच्याच अंगावर काटा येतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परतताना परळीतील आझाद चौकात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.
काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास
साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे
यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते अशी माहिती आहे. अपघातानंतर धनंजय मुंडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. मात्र त्यांच्या छातीला मार लागल्याने जखमी झाले आहेत. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या अपघाताची माहिती धनंजय मुंडें यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली असून स्वत: धनंजय मुंडेंनी या ट्वीटला रीट्वीट केलं आहे. हा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही